Published On : Wed, Mar 28th, 2018

टेकाडी ला रामनवमी पासुन हनुमान जंयती महोत्सव


कन्हान: टेकाडी येथे रामनवमी ला श्री हनुमान मंदिरात किर्तणाच्या कार्यक्रम सतत सात दिवस भजन मंडळीचा पाहरा या धार्मिक कार्यक्रमाने श्री हनुमान जंयती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली .

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही टेकाडी श्री हनुमान मंदिर येथे रामनवमी च्या पर्वावर साप्ताहिक खडा पायरा भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात श्री देवमनजी हुड भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, आरतीगण भजन मंडळ, जय माँ दुर्गा मंडळ, संत गजानन भजन मंडळासह इतर भजनी मंडळ खडा पायरा देणार आहे. यावेळी प्रथमच कीर्तन करनारे व खडा पायरा ला साथ देतांना तरूण मुलांचे अधिक प्रमाण मंडळात पाहायला मिळत आहे. या खडा पायरा चे वैशिष्ठ म्हणजे सूर न तुटता सातही दिवस उभे राहून निर्धारीत वेळेवर लागोपाठ भजन कीर्तन सुरू राहतात. तर या खडा पायऱ्यात इतर भजन मंडळानी सहभागी व्हावे असे आवाहन श्री हनुमान मंदिर पंच कमेटी व्दारे करण्यात आले आहे.


२५ मार्च पासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे हनुमान जयंती च्या दिवशी समापन करण्यात येणार असून रविवार १ एप्रिल ला दुपारी दहीकाला कार्यक्रमा नंतर भव्य महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे . करिता परिसरातील भाविक मंडळीने भव्य महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. श्री हनुमान जंयती महोत्सवाच्या यशस्वीते करिता श्री हनुमान मंदिर पंच कमेटी टेकाडी व समस्त गावकरी परिश्रम घेत आहेत.