Published On : Wed, Jul 10th, 2019

हज यात्रेला 18 जुलैपासून सुरुवात – जमाल सिद्दिकी

Advertisement

विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 18 जुलैपासून हज यात्रेला सुरूवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी आज येथे दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात हज यात्रेच्या व्यवस्थेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, छत्तीसगढ हज समितीचे अध्यक्ष सैय्यद सैफुद्दीन, सेंट्रल तंजीम कमेटी, नागपूरचे अध्यक्ष हाजी अब्दुल कादीर, महाराष्ट्र राज्य हज समिती, मुंबईचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी, अजीज खान, हाजी कलाम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जमाल सिद्दिकी यांनी हज यात्रेसंदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यात हज हाऊस मधील सोयी-सुविधांवर चर्चा करण्यात आली. हज यात्रेकरूंसाठी व्हीसा व पासपोर्ट वितरीत करणे, हज हाऊसमध्ये अग्नीशमन व्यवस्था, पाणी व इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच हज हाऊस परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, हज हाऊस स्वच्छ ठेवणे, हज यात्रेकरूंसाठी विदेशी चलनाकरीता विशेष कक्ष स्थापन करून त्याची सुरक्षा पोलीस विभागाद्वारे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.

हज हाऊसकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने तेथील अतिक्रमण महानगरपालिकेने काढण्याची कारवाई करावी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाने बंदोबस्त तैनात करावा, आरोग्य विभागातर्फे यात्रेकरूचे लसीकरण करण्यात यावे, त्यासाठी डॉक्टरांचे पथक व दोन रूग्णवाहिका तैनात करण्यात यावे, विमानतळ परिसरात नागपूर मनपातर्फे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, पिण्याचे पाणी पुरवण्यात यावे, हज यात्रेकरूंसाठी विमानतळापर्यंत यात्रेकरूंचे सामान पोहोचविणे यासह इतर ठेवण्यात येणा-या सोयी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बैठकीला महापालिकेचे सहायक आयुक्त राजेश मोहिते, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सराटकर, मिहान इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक (टर्मिनल) अमित कासटवार, एअर इंडियाचे व्यवस्थापक वसंत बरडे, सीआयएसएफचे कमांडंट रवी कुमार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर. व्ही. गलांडे, पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement