नागपूर : चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडाला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप भारत वर्मा (वय २६, रा. महाकालीनगर झोपडपट्टी, बेलतरोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
संदीप वर्मा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. परिमंडळ क्रमांक ४ चे पोलिस उपायुक्तांनी जून २०२४ मध्ये त्याला नागपूर शहर व ग्रामीण भागातून तडीपार केले होते. मात्र, आदेशाचे उल्लंघन करून तो पुन्हा नागपुरात परतला व गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय झाला.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बेलतरोडी पोलिसांचे पथक न्यू मनीषनगर परिसरात गस्त घालत असताना डीपी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ संदीप चाकूच्या धाकावर हैदोस घालत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला अटक केली असून त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





