Published On : Tue, Feb 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

हा तर प्रति सिद्धिविनायकच : आचार्य जितेंद्रनाथ महाराज

Advertisement

मोहगाव झिल्पी येथे श्री सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा

नागपूर : देशात मागील काही दिवसांपासून एक धार्मिक पर्व सुरू आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि वाराणसी कॅरिडोर हा संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. त्यापूर्वी अयोध्या येथे भव्य राम मंदिराची उभारणी सुरू झाली. त्याच मालिकेत संदीप जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले आहे. देशात सुरू असलेले हे पर्व ऊर्जावान पर्व असून त्याला धर्माचे अधिष्ठान आहे. समाजातील मांगल्य जिवंत ठेवण्यासाठी अशा मंदिरांचे अधिष्ठान आवश्यक आहे आणि झिल्पी तलावाजवळ वसलेला सिद्धिविनायक हा तर साक्षात मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचा प्रतिरूपच आहे, असे प्रतिपादन अंजनगाव सुर्जीच्या देवनाथ मठाचे पिठाधीष आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी केले.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने रविवारी (१३ फेब्रुवारी) झिल्पी तलाव मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अंजनगाव सुर्जीच्या देवनाथ मठाचे पिठाधीष आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परीणय फुके, महापौर दयाशंकर तिवारी, ज्यांच्या माध्यमातून मूर्ती प्राप्त झाली असे चित्रपट निर्माता दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी, राजेश लोया, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, मंदिरं माणसातील सद्विवेक जागृत ठेवण्यासाठी त्याला सद्बुद्धी देत असतात आणि माणसाला संस्कारक्षम बनविण्यासाठी त्याला दिशा दाखवत असतात. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, प्राचीन संस्कृतीमध्ये मंदिरं केवळ दर्शनासाठी नाही तर आपल्यासाठी माणूस म्हणून जगण्याचा एक आधार मंदिरात स्थापन केलेल्या देवी देवतांच्या मूर्तीमधून मिळत असतो. तीच प्रेरणा, तीच ऊर्जा आणि तोच आशावाद या पवित्रस्थळी निर्माण झालेला आहे. त्यातून अनेक भक्तांना, समाजातील अनेक लोकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Advertisement

जेव्हा माणसाच्या आयुष्यात धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड मिळत असते तेव्हा त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य हे समाधानाच्या दिशेने वाटचाल करीत असते. माणूस म्हणून त्याच्या जगण्याचे समाधान त्याला मिळत असते. अशाच कार्यातून संदीप जोशी आणि त्यांच्या सहका-यांना त्यांच्या जगण्याचे प्रयोजन सापडले आहे, असे सांगत त्यांनी ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

मोहगाव झिल्पीचे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर मुंबईतील प्रभावदेवी येथील सिद्धिविनायकाची आठवण आल्याविना राहत नाही. मूर्तीमंत सिद्धिविनायकाचे प्रभादेवी येथील देवस्थान झिल्पी येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे आता नागपूर आणि विदर्भातील भाविकांना मुंबईला जाण्यापेक्षा त्यांच्या जवळच झिल्पी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येईल. झिल्पी तलावानजीकच्या मंदिरातील हा सिद्धिविनायक सर्व भाविकांच्या मनोकामना पूर्ण करेल, असा विश्वास आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेले सिद्धिविनायकाचे भव्य मंदिर हे एक दैवी कार्य आहे. हे कार्य राजकारणाच्या, स्वार्थाच्या, नफ्या तोट्याच्या पलीकडचे आहे. संदीप जोशी यांना सामाजिक कार्यातून मिळालेल्या आंतरिक ऊर्जेतूनच हे ऐतिहासिक धार्मिक कार्य त्यांच्या हातून घडले असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मंदिराचा संपूर्ण परिसर, परिसरातील रस्त्यांवर विद्युत व्यवस्था नसल्यामुळे या संपूर्ण परिसरात विद्युतीककरणाची व्यवस्था करण्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी सुद्धा जाहिर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जोशी यांनी केले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ‘सोबत’ प्रकल्पाद्वारे कोरोनाच्या काळात ज्या मुलांचे आई वडील मरण पावले आहेत त्या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे पूर्ण शिक्षण, विवाहकार्याची आणि संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. दीनदयाल थालीच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दोनवेळच्या जेवणाची अवघ्या दहा रुपयांत व्यवस्था मागील चार वर्षापासून केली जात आहे. याशिवाय आर्थिक दुर्बल रूग्णांसाठी आरोग्य शिबिरे व गरज भासल्यास शस्त्रक्रिया, औषधोपचार आदी कार्यही करण्यात येत आहेत. या सर्व कार्यांची प्रेरणा श्री सिद्धिविनायक हेच आहेत. त्यांचे मंदिर उभारले जावे यासाठी मांडलेल्या संकल्पनेला आणि ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यांना अनेकांची साथ मिळाल्याने हे कार्य पूर्णत्वास नेता आले, अशी भावना व्यक्त करीत संदीप जोशी यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानले.

शुभेच्छा संदेशाद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे वेळेवर या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतू त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, एक ऐतिहासिक कार्य नागपूर नगरीत होत आहे आणि श्रीगणेश हे सुखकर्ता आहेत, ते दु:ख निवारण करीत असतात. मोहगाव झिल्पी सारख्या पवित्र अशा परिसरात आज सिद्धिविनायकाचे प्रतिष्ठापना होणे हे या परिसराला मांगल्य प्राप्त करून देणारी अभूतपूर्व घटना आहे. यासाठी मी श्री संदीप जोशी आणि त्यांच्या सहका-यांचे मनापासून आभार मानतो.

चैतन्यदायी वातावरणात सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना
रविवारी मोहगाव येथील झिल्पी तलावाजवळील मंदिरात धार्मिक, चैतन्यदायी वातावरणात श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी मंदिरात विधीवत पूजा झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. मंदिर उभारणीच्या कार्यात हातभार लागलेल्या सर्व सहकार्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल माटेगावकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पराग सराफ, ॲड.परेश जोशी, अनिरुद्ध भगत, रितेश गावंडे, गजानन निशितकर, प्रफुल माटेगावकर, योगेश जोशी, सुमेध कुलकर्णी यांच्यासह ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी सहकार्य केले.

Advertisement
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk | Video

Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...

nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges