Published On : Sat, Sep 22nd, 2018

आठवडी बाजाराचा विकास आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Advertisement

खापरखेडा: राष्ट्रीय महामार्ग व अधिन्यास परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजाराचे चिचोली वार्ड क्रमांक 1 परिसरात स्थलांतरण करण्यात आले आहे सदर आठवडी बाजाराचा महाजेनकोच्या सीएसआर फ़ंडातून विकास करण्यात या मागणीसाठी खापरखेडा पत्रकार संघाने पुढाकार घेतला असून यासंदर्भात ऊर्जा व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य अभियंता खापरखेडा यांना तीन दिवसांच्या आत आठवडी बांधकाम विकास आराखडा तयार करून महाजेनकोच्या मुख्य कार्यालतात पाठविण्याचे नुकतेच आदेश दिले आहे खापरखेडयाची मुख्य बाजारपेठ ही राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा आहे या परिसरात व अधिन्यासच्या जागेवर रविवार आठवडी भरतो या भागात अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या असून सदर घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे

परिसरात अपघाताच्या घटना, वाहनांची वर्दळ आणि सतत लोकसंख्या वाढत असल्यामुळे 1998 पासून जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, महाजेनको प्रशासन, जि. प.नागपूर, आ सुनील केदार आदिनी खापरखेडा परिसरात भरणारा आठवडी बाजार चिचोली वार्ड क्रमांक 1 येथील महाजेनकोच्या जागेवर स्थलांतरण करण्याच्या सूचना चिचोली ग्रामपंचायत प्रशासनाला व संबंधित विभागाला केल्या आहे यासंदर्भात सदर ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा पाठपुरावा केला आहे मात्र काही राजकीय नेत्यांच्या उदासीन धोरणामुळे रविवार आठवडी बाजार स्थलांतरण करण्याची प्रक्रिया रखडली नारळ पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या सुनिता गेडाम या महिलेचा ट्रक अपघातात 26 ऑगस्ट रविवार आठवडी बाजाराच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवी मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा 1998 पासून सदर आठवडी बाजार स्थलांतरण करण्याची मागणी ऐरणीवर आली दिनांक 28 ऑगस्ट तहकूब ग्रामसभेत सरपंच चांदेकर यांनी यावर चर्चा करून सर्वसंमती घेण्यासाठी खापरखेडा पोलीस स्टेशन येथे 30 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय सभेचे आयोजन केले

या बैठकीत नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदि उपस्थित होते सर्वांच्या प्रमुख उपस्थित रविवार आठवडी बाजार महाजेनकोच्या जागेवर चिचोली वार्ड क्रमांक 1 परिसरात स्थलांतरीत करण्यात आला मागील अनेक वर्षांपासून रखडलेली मागणी पूर्ण झाली चिचोली आठवडी बाजाराचा विकास करण्यासाठी महाजेनको प्रशासनाकडे 3 कोटी 28 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहे त्यापैकी सीएसआर फंडातून 11 लाख रुपयांचे बाजार ओठे तयार करण्यात आले आहे मात्र अजूनही महाजेनको प्रशासनाने याठिकाणी प्रस्तावित कामे पूर्ण केली नाही ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नाने कोराडी व महादुल्ला आठवडी बाजाराचा सर्वांगीन विकास करण्यात आला

त्याच धर्तीवर सीएसआर फंडातून चिचोली येथील रविवार आठवडी बाजाराचा विकास करण्यात यावा मागणी साठी ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना खापरखेडा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळा कडून निवेदन देण्यात आले यासंदर्भात बावनकुळे यांनी खापरखेडा औष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांना तिन दिवसाच्या आत आठवडी बाजाराचा विकास आराखडा तयार करून मुंबई येथील मुख्य कार्यालयात पाठविण्याचे आदेश दिले आहे याप्रसंगी अरुण महाजन, दिलीप गजभिये, प्रदीप खांबालकर, सुनील जालंदर, प्रकाश साद, मनोज डेव्हिड, केशव पानतावने, आकाश राऊत आदि उपस्थित होते.