कामठी-रामटेक मतदारसंघात पालकमंत्र्यांचा प्रचाराचा झंझावात

Advertisement

बीना, वारेगाव, सुरादेवी, बोखारा मतदारांशी जनसंपर्क

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी विधानसभा मतदारसंघातील आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये कार्यकर्ते आणि मतदारांच्या बैठकी घेऊन मतदारांशी संपर्क करीत भाजपा सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. अरोली, बोखारा येथे पालकमंत्र्यांच्या जाहीरसभा झाल्या. या जाहीरसभांना मोठ्या प्रमाणात मतदारांना गर्दी केली होती.

कामठी विधानसभा मतदारसंघात बिना येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी अरविंद खोबे, संजय मैंद, विजय पाटील, संकेत बावनकुळे, दिलीप तांडेकर, गंगाधर निखाळे, अरविंद गौरखेळे, भगवान चिखले हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचाराला आता जेमतेम 4 दिवस उरले असून कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराशी संपर्क करावा. मतदानाबद्दल नागरिकांना प्रवृत्त करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याची सूचना केली.

वारेगाव येथे गुंडेराव भाकरे, शंकर गोंडाळे, अरसपुरे, हिरामन घरत, लक्ष्मी घरत या प्रमुख कार्यकर्त्यांसह गावातील मतदारांशी संपर्क करून चुकीची बटन दाबू नका. चुकीच्या मतदानामुळे मतदारसंघ पाच वर्षे कसा माघारणार आहे, हे पालकमंत्री बावनकुळे यांनी मतदारांना समजावून सांगितले व आपण केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

सुरादेवी येथे सुनील वानखेडे, सुरेश गावंडे, शैलेश मानकर या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली व मतदानाच्या दिवशी जागरूक राहून कामे करण्याची सूचना केली. बोखारा येथे हिंगणा मतदारसंघाचे उमेदवार समीर मेघे यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेला पालकमंत्री बावनकुळे यांनी संबोधित केले.

रामटेक विधानसभा मतदारसंघात पारशिवनी, साहुली, करंभाड, अरोली, तारसा या गावांमध्ये कार्यकर्त्यांसोबत मतदारांशी संपर्क करून भाजपा शिवसेनेचे उमेदवार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्याचे महामंत्री अविनाश खळतकर त्यांच्या सोबत होते. तसेच अरोली येथील जाहीरसभेला सदानंद निमकर, विजय हटवार, शकुंतला हटवार, कुंभलकर, मदनकर, अशोक हटवार आदी उपस्थित होते.