Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, May 31st, 2018

  पालकमंत्र्यांचा वडोदा भूगाव व चंद्रपूर दौरा पुढे ढकलला

  chandrashekhar bawankule
  नागपूर: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या दिनांक 1 जून रोजी कामठी तालुक्यात वडोदा भूगाव येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच दिनांक 2 जून रोजी चंद्रपूर येथे महानिर्मितीची आढावा सभा आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दु:खद निधनामुळे पालकमंत्री बावनकुळे यांचा वडोदा भूगाव व चंद्रपूर हे दोन्ही ठिकाणचे दौरे तूर्तास पुढे ढकलण्यात आले असल्याचे पालकमंत्री कार्यालयातर्फे कळविण्यात आले. संबंधितांनी याची नोंद घ्यावी.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145