नागपूर : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली.
आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, मुख्य वनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.
नागपूर शहर व परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाच्या नागपूर ग्रामीण, शहर व आयुक्तालय हद्दीत नव्याने पोलीस स्टेशन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. यासोबतच महसूल व वने, मृद व जलसंधारण विभागासंदर्भातील विविध विषयांवर श्री. बावनकुळे यांनी यावेळी निर्देश दिले.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...





