Published On : Mon, Dec 9th, 2019

ग्रुप व्हायोलिनने रसिकांना रिझवले खासदार महोत्सवात पहिल्यांदाच झाले वादन

भेंडे लेआउटमध्ये ‘मैं लता’चे सादरीकरण

Advertisement

आपल्या शहरात अनेक उत्कृष्ट व्हायोलिन वादक आहे. शहरात संगीताचे अनेक कार्यक्रम होतात. त्यातही एकच वादक व्हायोलिन वाजवताना दिसतो. पण ‘मैं लता’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईच्या 14 वादकाचा समूह वादनाने रसिक भारावून गेले.

Advertisement

खासदार सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी भेंडे ले आउट येथे ‘ मैं लता’ हा

Advertisement

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त खास त्यांच्या सुमधुर गीतांचा हा नजराणा सादर करण्यात आला. एकापेक्षा एक सरस, गाजलेली आणि कर्णमधुर गाणी भेंडे ले लेआऊट परिसरातील रसिकांची सायंकाळ सुरमयी करून गेली.

या कार्यक्रमाचे संयोजक पराग माटेगावकर म्हणाले, लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर करणे सोपे नाही. त्याची काही गाणी सोपी वाटत असली तरी ती गायला आणि वाजवायला फार कठीण आहेत. त्यांचा कार्यक्रम करणे म्हणजे शाळेत सरस्‍वती पूजन करण्यासारखे असते.

नागपूरकरांना ग्रुप व्हायोलिन ऐकवण्याचे माझे स्वप्न होते. संगीताच्या क्षेत्रातील उत्कृष्ट व्हायोलिन वादक जीतू ठाकूरचा ग्रुप डोळ्यासमोर ठेवला होता. त्याला मी येथे आणू शकलो यातच आनंद आहे, असे पराग माटेगावकर म्हणाले.

प्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर, सुवर्णा माटेगावकर, शरयू दाते आणि गायक प्रशांत नासेरी यांच्या 14 व्‍हायोलिनीस्‍ट च्या चमूने लता मंगेशकर यांची गाणी अप्रतिम रित्या सादर केली.

स्वरदा गोखले हिने ज्योती कलश या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शरयू ने ओ चांद खिला हे गीत सादर केले. लोकांना प्रतीक्षा होती महालक्ष्मी अय्यर या लोकप्रिय गायिकेची रसम् ये उलफत या त्यांच्या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. मोगरा फुलला, असा बेभान हा वारा, सावन का महिना, यासह इतर अनेक रसाळ गाणी तयारीने सादर केली. शिवाय, जुन्या गाण्यांचा, युगलगीत आणि नव्या गाण्यांचा मिडले सादर करून, कलाकारांनी नागपूरकर कानसेनांना तृप्त केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन पराग माटेगावकर, व्हायोलीनवादक जितू ठाकूर, संगीत संयोजक चिराग पांचाल यांनी केले. तत्पूर्वी, महापौर संदीप जोशी, प्रा. अनिल सोले, प्रवीण दटके, दत्ताजी मेघे, डॉ विलास डांगरे, अनिल सावरकर, डॉ राजू काळे, श्रीकांत चितळे, राजेह बागडी, जयप्रकाश गुप्ता, रमेश भंडारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. कलाकारांचे स्वागत व प्रेरणा गीत झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. लतादीदींच्या अक्षरश: हजारो आणि तुल्यबळ गीतांमधून काहीच गाण्यांची निवड हेदेखील सादरकत्र्यांसाठी नक्कीच एक आव्हान ठरले असावे. स्वरसम्राज्ञीच्या ‘वंदे मातरम् या ह्रदयस्पर्शी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

‘मै लता’ आज वर्धमान नगरमध्ये
खासदार सांस्कृतिक महोत्सवात मंगळवार १० डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम वर्धमान नगरला होणार आहे. 

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement