Published On : Thu, Sep 7th, 2017

विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

नागपूर: राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. अप्पर आयुक्त रविंद्र जगताप यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी उपायुक्त पराग सोमण, संजय धिवरे, सहाय्यक संचालक कमलकिशोर राठी, तहसिलदार संपत खलाटे, श्रीराम मुंदडा, लेखाधिकारी विनायक जोशी यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.