राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बळीराजा दिनानिमित्त बळीराजास अभिवादन
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बहुजन संस्कृतीचा घटक बळीराजा यांना अभिवादन करण्यासाठी आज जनता चौक येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आमंत्रित करून बळीराजाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी बळीराजा हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असून त्या घटकाला इथल्या मनुवादी संस्कृतीने पाताळात ढकलण्याचा जो प्रयत्न केला त्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सक्षमपणे बळीराजा संस्कृतीचा गौरव करण्यास समर्थ आहे.
या प्रसंगी मागासवर्गीय समितीचे प्राध्यापक रमेश पिसे यांनी यानिमित्ताने या देशातील ओबीसीची जातवार जनगणना हा मुद्दा आमच्या संस्कृतीचा आणि हक्काचा एक भाग असून तो विनाविलंब सरकारने पूर्ण करावा अशी मागणी केली, त्यानंतर शरद वानखेडे यांनी ओबीसी मधील पदवीधर बेरोजगार यांच्या लढ्याचा संदर्भ आजच्या बलीराजा दिनानिमित्त सांगून या घटकाला जर सरकार न्याय देत नसेल तर सर्व यासंदर्भात विचार करावा लागेल असे व्यक्त केले याप्रसंगी राष्ट्रीय महासंघाचे जबाबदार व्यक्ती शकील पटेल यांनी सुद्धा ओबीसी संघर्षाची माहिती देताना सांगितले की ओबीसी ची संख्या महाराष्ट्रामध्ये 52 टक्के असून आज महाराष्ट्रातील एक लाख बेरोजगारांचा बॅकलॉग आहे आणि तो सरकारने लवकरात लवकर भरावा यातच ओबीसी समाजातील शेतकरी शेतमजूर कामगार कामकरी यांच्या हिताचे संरक्षण होईल, विद्यार्थी महासंघाचे महासचिव रोशन कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांना या निमित्ताने स्कॉलरशिप मिळाली पाहिजे असा नारा बुलंद केला.
एकंदरीत बळीराजा हा या संस्कृतीचा एकमेव घटक आहे आणि त्या घटकांमध्ये समाविष्ट असणारे बहुजन समाजातील अलुतेदार बलुतेदार अठरापगड जाती जमातींनी समाविष्ट असलेला ओबीसी समाज हा महत्त्वाचा आहे म्हणून या समाजाकडे सरकारने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट निर्माण करून त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुखकर करावा.
दिवाळी मधील बलिप्रतिपदा हा दिन संपूर्ण बहुजन समाजासाठी अत्यंत गौरवाचा आणि अस्मितेचा असून या दिनाचे निमित्त सर्व ओबीसी समाजाने आपल्या घराघरात जागृती केले पाहिजे असे याप्रसंगी सर्वानुमते व्यक्त करण्यात आले तसेच याप्रसंगी संजय पन्नासे, अरुण वराडे, गणेश नाखले, विनोद हजारे, शुभम वाघमारे, संजय हेडाऊ, जय वराडे, वैभव वराडे, मंगलमूर्ती सोनकुसरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते