Advertisement
नागपूर: महाराष्ट्राचे आराध्यदैत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे अभिवादन करण्यात आले. शिवाजीनगर येथील उद्यानातील शिवाजी महाराजांच्या सिंहसनारूढ पुतळ्याला महापौर नंदा जिचकार आणि राजे मुधोजी भोसले यांनी पुष्पहार चढवून त्यांना अभिवादन केले.
यावेळी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा राय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, रमेश मंत्री, श्रीकांत देशपांडे, अनिल हस्तक, मधुकर भालेराव, पांडुरंग क्षीरसागर, वनिता हस्तक, उत्तरा देशपांडे, गणेश गुल्लाड प्रामुख्याने उपस्थित होते.