Published On : Fri, Sep 25th, 2020

पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन

ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले तैलचित्राला माल्यार्पण

नागपूर. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

प्रभाग २६मध्ये झालेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, सुरेश बारई, प्रशांत मानपूरे, निखिल कावळे, पुंडलिक पालटकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, पंडीत दीनदयाल उपाध्याय हे अंत्योदयचे प्रणेते आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले. ‘एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान, नहीं चलेंगे’ अशी ठाम भूमिका घेउन निडरपणे त्यांनी संघर्ष केला. मात्र तत्कालीन सरकारच्या कटाला ते बळी पडले. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे विचार आणि कार्य शास्वत स्वरूपात उतरविण्यासाठी शेवटच्या व्यक्तीपर्यंत शास्वत विकास प्रवाहित करण्यासाठी आजचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार कार्य करत आहे. हे अभिमानास्पद आहे. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे कार्य येणा-या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणार आहे. ते कार्य येणा-या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी आपण सर्वांनी कार्य करणे आवश्यक आहे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.