Published On : Mon, Jun 24th, 2019

मातेश्वरी जगदंबा सरस्वती(मम्मा)चा स्र्मूर्ती दिनानिमित्त अभिवादन

कामठी :-मातेश्वरी जगदंबा सरस्वती(मम्मा)यांच्या समूर्तीदिनानिमित्त आज 23 जून ला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रणाळा कामठी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी यांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.

याप्रसंगी ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी यांनी मम्मा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश घालीत उपस्थित अनुयायांना मौलिक मार्गदर्शन केले.मम्मा एक उत्कृष्ट वक्ता तसेच प्रभावशाली व्यक्तीमतत्वाचे धनी होते .वयाच्या 14 व्या वर्षात यज्ञात प्रवेश करीत शेवटपर्यंत यज्ञाची जवाबदारी सांभाळली .सदैव जीवनभर लोककल्याणार्थ कार्य केले आणि या त्याग , तपस्याच्या जीवनशैलीतून सन 1965 मध्ये जगाचा निरोप घेतला.या मौलिक मार्गदर्शनातून मम्मा ला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान माउंट अबू मध्ये आयोजित 3 दिवसीय मीडिया सम्मेलन कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या पत्रकार लोकमत समाचार चे राजेश आहुजा,दैनिक भास्कर चे उपसंपादक राकेश फेंडर चा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माउंट अबू मध्ये आयोजित विशाल सभागार सणार्पण कार्यक्रमात कामठी तून समर्पण झालेल्या चंद्रकला दीदी चा तिलक माला, व चुनरी देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ब्रह्मकुमारी वंदना दीदी, शिलु दीदी, घनश्याम चकोले आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी