Published On : Mon, Jun 24th, 2019

बीडगाव येथे ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार’

Advertisement

कामठी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून यातील प्रावीन्यप्राप्त सह गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत करीत त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी योग्य ते मार्गदर्शन प्राप्त व्हावे या मुख्य उद्देशाने आज दि २३ जुन रोजी श्री गजानन शिक्षण सेवा संस्था द्वारा बिडगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ता सत्कार कार्यक्रमात संघटनेच्या अध्यक्षा प्रा. अवंतिकाताई लेकुरवाळे, प्रसिद्ध साहित्यिक विणायकजी जामगडे, प्रा. रमेशजी बोरकुटे, प्रा. सुखदेवजी ठाकरे, युवा रमेश लेकुरवाळे, मनोहर कोरडे, आशिष मल्लेवार, तरोडी ग्रा प चे उपसरपंच अमोल महाल्ले, ग्रामपंचायत सदस्य आसिफ भाई शेख, मनिषाताई कुंभरे, वैशालीताई कोकुर्डे, सविताताई पंचबुधे, धनराजी तलमले, बिसेन गुरुजी, अॅड. अदिती पारधी, मनोहर कोहाड इ उपस्थित होते.

याकार्यक्रमात बिडगाव, तरोडी, खेडी परसोडी ई. गावातुन २८७ विद्यार्थ्याचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. बारावी व दहावी मध्ये परिसरातुन प्रथम द्वितिय व तृतिय विद्यार्थ्यांना गौरन्वित करण्यात आले. इयत्ता दहावितील प्रथम पुरस्कार दामिनी गोविंद तलमले द्वितिय पुरस्कार आरुषी अंकुश कोकाटे व रोहिनी सहारे तृतिय पुरस्कार प्रणय गोपाल डफर यांना तसेच बारावितिल प्रथम पुरस्कार कृष्णकुमार होमराज पटले
द्वितिय पुरस्कार शुभम सुरेंद्र पटले व तृतिय पुरस्कार चंद्रलेश विश्वकर्मा तसेच ईतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्रा अवंतिका लेकुरवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की आपणच आपल्या जिवनाचे शिल्पकार आहोत. कोणतिही फिल्ड ही कमी किंवा अधिक महत्वाची नसते .

स्कोप सर्वच क्षेत्रात आहे. परिस्थिती ही कधिच यशामध्ये अडसर ठरु शकत नाही. परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करावी लागेल. या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. रमेश बोरकुटे यांनी करिअरविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उभरते युवा नेतृत्व आशिष मल्लेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शामरावजी पंचबुधे यांनी केले.

तर कार्यक्रमाच्या यशासाठी स्वप्निल राऊत, अतुल बाळबुधे अमोल खोडके गणेश महाले संजु काळे, सतिषजी बरडे विलास मोहड निरंजन खोडके शिवानंद सहारे निरज समुद्रेअनिल झोडगे दिगांबर हजारे मनोहरजी मटाले सचिन ढोमणे लक्ष्मी चौधरी पुजा राणा आरती बोपचे देवेंद्र राजेश निशाने होमराज पटले बोपचे सुरेश गौतम प्रमोद पटले मोरेश्वर घारपेंडे नयन जामगडे इ. अथक परिश्रम घेतले.

संदीप कांबळे कामठी