Published On : Sat, Feb 20th, 2021

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

Advertisement

नागपूर : ‘दर्पण’ हे मराठीतील आद्य वृत्तपत्र काढून समाजतील अंधश्रद्धा, कुरिती, कुप्रथांविरुद्ध ज्यांनी आपली लेखणी चालवून अन्यायाविरुद्ध लढा दिले असे आद्य पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांची उपस्थिती होती.