Published On : Sat, Jul 13th, 2019

बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

नागपूर : वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

रामनगर चौक स्थित त्यांच्या पुतळ्याला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. यावेळी जनसंपर्क विभागाचे राजेश वासनिक यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.