Published On : Sat, Jan 13th, 2018

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त म.न.पा तर्फे अभिवादन


नागपूर: उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असा ओजस्वी संदेश युवकांना देणा-या स्वामी विवेकानंदांची जयंती निमित्त महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती रुपा राय, बालकल्याण समिती अध्यक्षा वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका परिणीता फुके यांनी अंबाझरी टी-पॉइंट येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

म.न.पा. मुख्यालयातील स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला महापौर व्दारा अभिवादन
नागपूर महानगरपालिकेतील मुख्यालय स्थित सत्तापक्ष कार्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला महापौर नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, महिला बालकल्याण समितीचे सभापती वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक सुनिल अग्रवाल, नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नगरसेवक लहुकुमार बेहते, नगरसेवक लखन ऐरावार, नगरसेविका लता काटगाये, नगरसेविका अभिरुची राजगिरे, अति. उपायुक्त रविंद्र देवतळे,‍ अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांचेसह मनपाचे बहुसंख्य पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement