Published On : Wed, Oct 2nd, 2019

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्णजयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्यालयात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त अभिजीत बांगर आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून मनपाच्या वतीने अभिवादन केले.

यावेळी नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, कर निर्धारक तथा संग्राहक दिनकर उमरेडकर, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, विजय राहाटे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, दिलीप तांदळे उपस्थित होते.

Advertisement

यानंतर मनपाच्या वतीने व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला तसेच गोकुळपेठ येथील लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मालार्पण करून अभिवादन केले. यावेळी आरोग्य उपसंचालक संजय जैस्वाल उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement