Published On : Mon, Nov 19th, 2018

भारतरत्न स्व. इंदिरा गांधी जयंती निमित्त म.न.पा.तर्फे शांतीनगर स्थित पुतळयाला अभिवादन

नागपूर: माजी पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त शांतीनगर स्थित इंदिराजींच्या प्रतिमेला उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, विपक्ष नेता श्री. तानाजी वनवे व प्रभागाचे नगरसेवक श्री.नितीन साठवणे यांनी सकाळी म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी ॲङ . अभिजीत वंजारी, निर्मलताई बोरकर, ज्ञानेश्वर ठाकरे, विनोद अफरेले, राजेश यादव, देशमुख गुरुजी, सौ. रेखाताई यादव, वाडबुजे गुरुजी, चंदा राऊत आदी उपस्थित होते.