Published On : Wed, Jul 17th, 2019

रा.बा.कुंभारे पुण्यतिथी निमित्त उपमहापौर व्दारा अभिवादन

विणकर नेते रा.बा.कुंभारे यांच्या पुण्यतिथी निमित्त गांधीबाग स्थित कुंभारे यांच्या प्रतिमेला उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले

या प्रसंगी सर्वश्री. आर.आर.व-हाडे, के.बी.हटवार, यु.बि.क्षेत्रपाल, राजू आदमने, गणेश ग्रावकर, मनोज खरे, कबीर खान, जमील अन्सारी प्रामुख्याने उपस्थीत होते.

अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी दि.१८ जुलै २०१९ रोजी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.१८.०७.२०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता महापौर श्रीमती नंदाताई जिचकार व उपमहापौर श्री.दीपराज पार्डीकर हे दिक्षाभूमी चौक स्थित अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करतील.