Published On : Thu, Aug 29th, 2019

पुरग्रस्त भागात साहित्य रवाना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ट्रकला हिरवी झेंडी

Advertisement

नागपूर : सांगली कोल्हापूर भागात नुकत्याच आलेल्या पुरामुळे तिथे भीषण परिस्थिती ओढवली आहे. सध्या पूर ओसरला जरी असला तरी पुरामुळे झालेले नुकसान दुःखदायक आहे. राज्याच्या, देशाच्या अनेक भागातून तिथे मदतीचे हात सरसावले आहेत.

धान्य, कपडे, औषधी इत्यादी सामान तर तिथे पोहचतच आहे पण शालेय विद्यार्थ्यांच पण बरंच नुकसान ह्या पुरामुळे झालेलं आहे. ह्याच अनुषंगाने नागपूरातुन पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विद्याभारतीच्या पुढाकाराने आणि जैन मंदिर इतवारी तसेच डी पी जैन एज्युकेशनल ट्रस्ट नागपूर, संदीप अग्रवाल आणि शुभम ह्यांच्या सहयोगाने शालोपयोगी वह्या, दप्तर, डब्बे आणि पिण्याच्या बाटल्यांचा ट्रक रवाना झाला.

आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी रवीभवन येथून निघालेल्या ह्या ट्रकला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे आणि नागपूर महानगर सहकार्यवाह अरविंद कुकडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी विद्याभारतीचे पदाधिकारी तसेच डी पी जैन एज्युकेशनल ट्रस्टचे पदाधिकारी धर्मेंद्र शर्मा आणि चैतन्य देशपांडे उपस्थित होते. कोल्हापूर सांगलीच्या मदतीसाठी डी पी जैन एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे महिन्यातून दुसऱ्यांदा ही मदत पाठवल्या गेली आहे हे विशेष.