Published On : Fri, Dec 6th, 2019

वाहनांचा लाखोंचा ग्रीन टॅक्स अडकला

– आरटीओकडून वाहन मालकांना बजावली नोटी

Advertisement

नागपूर: शहरातील १५ लाख वाहनांपैकी हजारो वाहनांनी अद्यापही ग्रीन टॅक्स भरलेला नाही. या गंभीर बाबीची दखल घेत आरटीओ अधिकाèयांनी वाहनमालकांना नोटीस बजावली आहे.

Advertisement

सर्रास नियमांचे उल्लघन करून वाहन चालविणाèयांमुळे लाखो रुपयांचा टॅक्स थांबला आहे. आरटीओने ३ हजार वाहनमालकांना नोटीस बजावली असली तरी टॅक्स न भरणाèयांच्या यादीत यापेक्षा अधिक वाहनांचा समावेश आहे.

Advertisement

नियमानुसार दुचाकी qकवा चार चाकी वाहन चालविण्यासाठी कंपनी १५ वर्षांचा अवधी निर्धारीत करतो. म्हणजे पर्यावरणाला प्रदुषीत न करता हे वाहन १५ वर्षांपर्यंत चालू शकतात. १५ वर्षानंतर मात्र, वाहनांचे आयुष्य संपायला लागते. अर्थात कंपनीने दिलेला अवधी संपतो. म्हणजे ते वाहन रस्त्यावर चालविण्या योग्य नसते. अशी वाहने रस्त्यावरून चालविल्यास शहरातील वातावरण प्रदुषित होईल. तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनेही ते वाहन योग्य राहात नाही. अशा स्थितीत मुदतबाह्य वाहनांना आरटीओची परवानगी घेवून भंगार केले जाते. qकवा विशेष प्रक्रियेव्दारे पास करून टॅक्स भरल्यानंतर पुढील पाच वर्षाकरीता वैद्य ठरविले जाते. या प्रक्रियेला आरटीओच्या भाषेत ग्रीन टॅक्स म्हणतात.

आरटीओची परवानगी मिळाल्यानंतरच पुढील पाच वर्षांपर्यंत वाहन चालविल्या जावू शकते. मात्र, बहुतेक वाहनधारक नियमांचे सर्रास उल्लघन करून १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या गाड्यांनाही रस्त्यावर चालवित आहेत. शिवाय दर वर्षांला वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. आरटीओने अशा ३ हजार वाहन मालकांना ग्रीन टॅक्स भरण्याकरीता नोटीस बजावली आहे. वाहनधारकांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यास अशा गाड्यांना भंगार घोषित केले जाईल.

वाहन भंगार झाल्याची सूचना नाही
१५ वर्षांनतर वाहन भंगार होते. आरटीओ नियमानुसार वाहनधारकांना वाहन भंगार करण्याचे अधिकार नाही. यासाठी आरटीओ अधिकाèयांकडून परवानागी घ्यावी लागते. यानंतरच वाहन भंगार मानले जाते. अशा स्थितीत आरटीओ अधिकाèयांना त्या वाहनधारकांकडून ग्रीन टॅक्स वसूल करण्याचे अधिकार आहेत.

रेकार्ड वरील वाहन
आरटीओच्या नोंदणीनुसार शहर आरटीओ कार्यालयात एकून १ लाख ७७ हजार ९९१ तर पूर्व आरटीओ कार्यालयात १ लाख ७६ हजार ६०४ दुचाकी वाहन आहेत. मोटारकारची संख्या -१ लाख १६ हजार, पूर्व कार्यालय – २१ हजार ७९४, शहरात ऑटोरिक्षा – ४ हजार ८७४, पूर्व कार्यालयात- ७ हजार ७४१, खाजगी रीक्षांची संख्या – ४ हजार ७६, शहरात स्कूल बस-४१७, पूर्व कार्यालयात – ९०३ एकून १५ लाख २० हजार १८८ वाहने आहेत.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement