Published On : Sat, Jun 24th, 2017

शहर वाहतूक पोलिसांच्या ग्रीन कॉरिडोर मुळे 4 मिनिटात अवयव पोहचले विमानतळवर

Green Corridor
नागपूर:
नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या अत्यंत उत्साही आणि वेगवान सुरळीत वाहतूक व्यवस्थेमुळे नागपूर मध्ये केलेले अवयव दान वाहून नेण्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत करून ऑरेंज सिटी हॉस्पिटल ते विमानतळ हे अंतर अवघ्या 4 मिनिटं मध्ये पार करण्यास मदत झाली.

आज सकाळी ऑरेंज सिटी हॉस्पिटल मधून वाहतूक विभागाला सकाळी 10:30 वाजता कळवण्यात आले की विनायक रामराव देशकर, वय 67 वर्ष यांचे नातेवाईक त्यांचे अवयव दान करणार असून त्यावर शस्त्रक्रिया करून सदर अवयव विशेष विमानद्वारे मुबंई येथे घेऊन जायचे आहेत तरी आम्हाला ऑरेंज सिटी हॉस्पिटल ते नागपूर विमानतळ वाहतूक व्यवस्था रस्ता “ग्रीन कॉरिडॉर” करून आपली मदत हवी “अश्या माहितीवरून वाहतूक पोलीस उपायुक्त श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, भांडारकर, बेसरकर, बाजाजनागर पोलीस स्टेशन चे नंदांनवार व इत्यादी 06 अधिकारी व 50 वाहतूक कर्मचारी अवघ्या 30 मिनिटांत उपलब्ध करून दिले.

सर्व तयारी करण्यात आली परंतु वारंवार खराब हवामानामुळे मुबंई नियंत्रण कक्ष येथून विमानस खराब हवामान असल्याने परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे अवयव वाहतूक करण्याचा वेळ वारंवार बदलण्यात आला तरी सकाळपासून वाहतूक पोलीस सायंकाळी 04:25 पर्यंत रस्त्यावर थांबून राहिले शेवटी 04:25 वाजता ग्रीन कॉरिडॉर तयार करून वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त करून वाहतूक सुरळीत केली व सदर देणं केलेले अवयव orange सिटी हॉस्पिटल ते नागपूर विमानतळ हा प्रवास अवघ्या 04 मिनिटांत यशस्वी पार करण्यात मोलाची मदत केली ,दान केलेले अवयव मुबंई येथील गरजू रुग्णांना प्रत्यारोपण केले जाणार आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहर वाहतुक पोलिसांनी केलेल्या या अत्युल्य कामगिरीचे कौतुक सर्व वैद्यकीय व सर्व जनतेकडून होत आहे आणि नागपूर शहर वासीयांना एक यशस्वी प्रयोग करणयात आल्याचा अभिमान वाटत आहे.

Advertisement
Advertisement