Published On : Thu, May 25th, 2017

पैश्याच्या मोबदल्यात खूप मोठे काम – नंदा जिचकार

Advertisement


नागपूर:
स्वच्छतादूतांचे कार्य म्हणजे एक सेवाच असते. आपले शहर स्वच्छतेच्या दृष्टीने कुठेही मागे राहू नये त्याचबरोबर समाजाच्याभल्यासाठी, आरोग्यदायी वातावरणासाठी सतत राबणाऱ्या स्वच्छतादूतांच्या कार्याचे मोल पैशात मोजता येत नाही, असे मत महापौर नंदाजिचकार यांनी व्यक्त केले.

गुरुवार, दिनांक २५ मे रोजी मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात, महापौरांच्या हस्ते महिला स्वच्छतादूतांना धनादेशाचे वाटपकरण्यात आले. याप्रसंगी आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सेंटर फॉर सस्टेनेबल रिसर्च सेंटरच्या संचालिका लीना बुधे आदी उपस्थित होते. उघड्यावर शौचापासूनमुक्त शहर करण्यासाठी स्वच्छतादूतांची ४-६ महिन्यांसाठी नियुक्ती केली जाते. यासाठी त्यांना पाच हजार रुपये मानधन दिल्या जाते. २५ टक्केकाम सुरु असताना, ५० टक्के त्यांची वस्ती उघड्यावर शौचापासून मुक्त (ओडीएफ) घोषित झाल्यावर तसेच २५ टक्के रक्कम त्यांची वस्तीओडीएफ घोषित झाल्याच्या तीन महिन्यानंतर प्रदान केली जाते. गुरुवारी महापौरांच्या हस्ते स्वच्छतादूतांना मानधनाचा १२५० रुपयांचा पहिलाहप्ता प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, भगिनींनो तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. फक्त यातसातत्य राहू द्यावे. सकाळी ५ वाजता उठून उघड्यावर शौच करणाऱ्यांना तुम्ही परावृत्त करता, वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयाच्याबांधकामासाठी मनपाकडून मदत घेण्यास मदत करता. त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेणे, पहिला हप्ता मिळवून देणे या कामासाठी चार-पाचमहिन्यांसाठी जरी तुमची नियुक्ती झाली असली तरी आपापल्या पातळीवर हे सेवाभावी कार्य सातत्याने सुरुच ठेवा. झोपडपट्टीमध्ये आरोग्याच्याअनेक समस्या असून उघड्यावर शौचामुळेच त्या उद्‌भवतात. गरिबांचा सर्वात जास्त पैसा हा डॉक्टारांची फी देण्यातच खर्च होतो.

यापेक्षा वस्ती-वस्तीत शौचालयांचा वापर करण्यासाठी त्यांना प्रेरीत करण्याचे आवाहन यावेळी महापौर यांनी केले. येत्या १ जूनपासून नागपूर शहरातराबविण्यात येणाऱ्या ओला व सुका कचरा विलगीकरणाबाबतदेखिल झोपडपट्टीतील महिलांना जागृत करण्याचे आवाहन स्वच्छतादूतांनायाप्रसंगी महापौरांनी केले. ओला व सुका कचरा विलगीकरणात सुरवातीला स्वच्छतादूतांना मत परिवर्तनासाठी कष्ट घ्यावे लागतील, मात्रहळूहळू त्यांना सवय लागेल.


आयुक्त अश्विन मुदगल यांनी उघड्यावर शौचापासून मुक्त शहर हे स्वच्छता अभियानाचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. मनपा या दिशेनेगतीने पाऊले उचलत आहे. मात्र अद्यापही काही भागात नागरिक उघड्यावर शौचास जाताना आढळतात. यामुळे आम्हाला स्वच्छतासंबधी‘ओडीएफ प्लस’ व त्यानंतर मिळणारे ‘ओडीएफ प्लस प्लस’ हे गुणांकन मिळविण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. हे ध्येयगाठण्यासाठी स्वच्छतादूतांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यापूर्वी सत्याचा आग्रह धरुन आंदोलनकरणारे सत्याग्रही होते त्याच प्रकारचे आंदोलन स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या स्वच्छतादूतांना आता उभारायचे आहे. वेळ फार कमी असूनजबाबदारी फार मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. उघड्यावर शौचापासून परावृत्त करण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वच्छतादूतांवर असल्याचेआयुक्तांनी सांगितले. ही भूमिका वठविताना कोणतीही अडचण आल्यास मनपा ठामपणे तुमच्या पाठिशी उभी राहील, असे आश्वासन ही त्यांनीदिले. स्वच्छतेप्रतीची आग्रही भूमिका मनपा व स्वच्छतादूतांनी आता घेतली असून आपले शहर सुंदर व आरोग्यदायी करण्यास कोणतीही शक्तीआम्हाला आता रोखू शकत नाही, असे अश्विन मुदगल यांनी सांगितले. अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी या कामात स्वत:ला झोकूनदेण्याचे आश्वासन दिले. आभार डॉ. प्रदीप दासरवार यांनी मानले.