Published On : Fri, Oct 16th, 2020

साईबांबाचां समाधिदिन निमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन

नागपूर : श्री.साईबाबा श्रद्धा सबुरी सेवा संस्थान नागपूर ( साईदूत परिवारांतर्फे) विद्यमाने आज गुरुवार दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी, श्री. साई बाबांच्या समाधी दिना निमित्त आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा शेकोडो भक्तांनी लाभ घेतला. वर्धा रोड साई मंदिराच्या बाहेर रोडवरील महाप्रसादाचा मोठ्या उत्साहाने साईभक्तांनी आनंद घेतला. त्यापुर्वी साईबाबा च्या प्रतिमेला पूजा आरती करून नंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली.

नागपुरातील साई भक्तांनी बाहेरूनच दर्शन करून पुरी, भाजी, आणि सोनपापडी अशा प्रकारे महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री.साईबाबा श्रद्धा सबुरी सेवा संस्थांचे सचिव साईदूत अनुप मुरतकर यांनी हि माहिती प्रसिद्धीपत्रकात दिली.

तसेच उद्देशुन बोलले निस्वार्थ सेवा हेच आमचे कार्य,

जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव
..विशेष म्हणजे इ.सन.1918 मध्ये 15 ऑक्टोबर या रोजी हिंदू चा दसरा, मुस्लिमांचा रमजान चा नववा दिवस, बुद्धलोकांचा विजयादशमी आणि त्याच दिवशी एकादशी होती. याच दिवशी दुपारी साईबाबांनी दोन वाजून वीस (2:20 ) मिनिटांनी समाधि घेतली होती हे विशेष आहे.