Published On : Fri, Oct 27th, 2017

राज्यपालांच्या हस्तेनॅशनल फ्लॅग डे फॉर ब्लाइंडचे उद्घाटन


मुंबई:  नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडया अंध व्यक्तींच्या शिक्षण,कौशल्य प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्रशाखेच्यावतीने आयोजित अंधांच्या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘फ्लॅग डे ड्राईव्ह २०१७’ चे उदघाटन आज शुक्रवारी (दि 27)राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. नॅब या संस्थेविषयी तयार करण्यात आलेल्या ‘सिक्स डॉट’ या माहितीपटाचे ही यावेळी अनावरण करण्यात आले.

राज्यपालांनी आपल्या भाषणात खासगी संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी अंधव्यक्तीच्या कल्याणासाठी पुढाकार घ्यावा तसेच प्रत्येकाने नेत्रदान करणार अशी शपथ घेतली पाहिजे असे नमुद केले.


नॅबचे मानद सचिव गोपी मयूर यांनी राज्यपालांच्या शर्टला स्टॅम्पच्या आकाराचा फ्लॅग लावला तसेच राज्यपालांनी फ्लॅग फंडसाठी दान ही दिले. नॅबची स्थापना 1952 मध्ये झाली असून अंधाचे शिक्षण, रोजगार आणि पुनर्वसन क्षेत्रात ही संस्था काम करते.

यावेळी नॅब चे अध्यक्ष रामेश्वर कलोत्री, संस्थेचे मानद सचिव गोपी मयूर तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.