Published On : Sat, Feb 24th, 2018

शासनाची स्मार्ट ग्राम योजना कागदावरच

Advertisement

Devendra Fadnavis
नागपूर/खापरखेडा: केंद्र व राज्य शासन सर्वसामान्या साठी अनेक महत्वपुर्ण योजना राबवित आहे महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थानं ‘इको व्हिलेज’ योजना बंद करून स्मार्ट ग्राम योजना महा. शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र./स्मग्रायो-2015/प्र.क्र.151-अ/योजना-1 दिनांक 21.11.2016 रोजी सुरू केली आहे सन 2016-2017 साली सुरू झालेल्या या योजनेत नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींनी भाग घेतला तालुका स्तरावर 13 ग्रामपंचायत व जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली तालुका स्तरावर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला 10 लाख जिल्ह्यातून निवड झालेल्या ग्रामपंचायतला 40 लाख बक्षिसे देण्यात आली मात्र सदर बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यात अजूनही जमा न झाली नाही ती केव्हा मिळणार?असा प्रश्न उपस्थित झाला असून स्मार्ट ग्राम योजना कागदावरच दिसून येत आहे.

त्यामुळे कथनी करणीवर फरक दिसून येत असून शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे राज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकषात व स्वरूपात बदल करून दिनांक 21.11.2016 रोजी अध्यादेश पारीत करून स्मार्ट ग्राम योजना सुरू केली असून राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीस शासनाने सदर योजनेत सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली सदर योजनेत शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन पध्द्तीने निवड करण्यात आली स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण व पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष ठरविण्यात आले असून 100 गुण देण्यात ठेवण्यात आले होते.

नागपूर जिल्ह्यातून तालुका स्तरावर निवडून आलेल्या 13 ग्रामपंचायतला 10 लाख व जिल्ह्यातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतला 40 लाख रुपये 2016-2017 स्मार्ट ग्राम योजने नुसार बक्षिसे जाहीर झालीत समंधित ग्रामपंचायत प्रशासनाला सरपंच व सचिवांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले मात्र आज 10 महिन्याच्या कालावधी लोटला एक दमढीही खात्यात जमा झाली नाही नागपूर जिल्ह्यात स्मार्ट ग्राम योजनेसाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांचा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कस्तुरचंद पार्कवर 1 में 2017 ला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले मात्र स्मार्ट ग्राम योजनेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीला अजूनही बक्षिसाची रक्कम प्राप्त झाली नाही स्मार्ट ग्राम योजना 2017-2018 अंतर्गत निकष पात्र ग्रामपंचायतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

मात्र 2016-2017 स्मार्ट ग्राम योजनेची बक्षिसे ग्रामपंचायतीला अजूनही मिळाले नाही तेव्हा शासनाची ही योजना फ़सवेगिरी तर नाही ना असा प्रश्न पडला आहे यासंदर्भात उपमुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिल तयार असून आर्टिझेज करून खात्यात जमा करण्यात येईल एक दोन दिवसात माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.