Published On : Fri, Aug 23rd, 2019

नागरिकांना शुध्द पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची : पालकमंत्री

Advertisement

नवीन कामठी भागात जलशुध्दीकरण संयंत्राचे लोकार्पण
सीएसआर निधीतून 25 जलशुध्दीकरण यंत्र उभारणार

नागपूर: दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. खराब पाण्यामुळेच बरेच आजार होत असतात. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठ़ी शुध्द पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची असून राज्यात विविध ठिकाणी शुध्द पाण्यााचे जलशुध्दीकरण केंद्र उभारले जात आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नवी कामठी भागातील कुंभारे कॉलनी येथे जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत शुध्द पाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारणीस सहकार्य करणार्‍या डीआयजीओ कंपनी लि. युकेचे अधिकारी शुभृतो गिद, अवंती शंकरनारायणन, संगीता ठकराल, शुभृतो बॅनर्जी तसेच न.प.चे मुख्याधिकारी रमाकांत डाके, भाजपचे शहर अध्यक्ष विवेक मंगतानी, नगरसेवक प्रतीक पडोळे, छोटू मानवटकर, संध्या रायबोले, सुषमा सिलाम, स्नेहलता गजभिये, दीपक सीरिया, अजय कदम, दीपांकर गणवीर, कमल यादवे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते जलशुध्दीकरण केंद्राचे संचालन करणार्‍या पाच निवडक महिला बचत गटाच्या पदाधिकार्‍यांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश खंडेलवाल, सचिन पाटील यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांनी अधिकार्‍यांना आणखी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर अधिकार्‍यांनी तात्काळ 25 जलशुध्दीकरण केंद्र मंजूर केले. महिला बचत गटांना ना नफा ना तोटा तत्वावर जलशुध्दीकरण केंद्र चालविण्यास देण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली.

वृक्षारोपण शुध्द पाण्यासोबतच शुध्द हवा देखील आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे, असे याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. सम्राटनगर मैदानात विविध ठिकाणी 50 वृक्षांची लागवड करण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement