Published On : Mon, Apr 16th, 2018

सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान

Advertisement
water

File Pic

नागपूर: राज्यातील नागरी भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने राज्यात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कामठी शहराच्या पाणीपुरवठा व पर्जन्य जलवाहिनी या पाणीपुरवठ्याच्या दोन कामांसाठी नगरविकास विभागाने कामठी शहराला 5.82 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मान्यता दिली आहे. या संदर्भातील एक परिपत्रक आज शासनाने जारी केले आहे. या दोन कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 33 टक्के निधीचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेसाठीचे प्रस्ताव 10.41 कोटी व पर्जन्य जलवाहिनीसाठीचे प्रस्ताव 10.14 कोटी रु. असे एकूण 20 कोटी 55 लाख रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यातील पहिल्या हप्त्याच्या 33 टक्के निधीला शासनाने मान्यता दिली आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करून कामाला सुरुवात करावी व नियोजित कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच या प्रकल्पासाठी नगरपरिषदेने दुसर्‍या हप्त्याची मागणी करण्यापूर्वी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत मंजुरी भुयार गटार योजनेचे काम पूर्ण करणे अनिवार्य राहील. प्रकल्पाच्या कामाचा अहवाल वेळोवेळी राज्य शासनाला सादर करावा, असे शासनाने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above