Advertisement
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटाळ-पांजरी परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात कार्तिक धार्मिक हा तरुण जखमी झाला.
गोळीबारात जखमी झालेल्या कार्तिकला तातडीने उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, गोळीबार करणारे आरोपी कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून, परिसरातील माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.





