Published On : Mon, Sep 30th, 2019

गोपीचंद पडळकर; हा ढाण्या वाघ,ढाण्या वाघाने बारामतीमधून लढावे:फडणवीस

Advertisement

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं असावं, म्हणून माझं असं म्हणणं आहे की गोपिचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले आणि उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा दिला.

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला.

गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी भाजपत प्रवेश केला. ‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं असावं, म्हणून माझं असं म्हणणं आहे की गोपिचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले आणि उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा दिला.

पडळकर वंचितमध्ये गेल्याचे दु:ख झाले होते. पडळकर हे पुन्हा घरात परत आले आहे. त्यांनी धनगर समाजाचे व्रत स्वीकारले, तसेच समाजाला संघटित केले आणि समाजाचा आवाज बुलंद केला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. पडळकर हे माझे जवळचे मित्र आहेत असे सांगत आदिवासी समाजाच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू करू आश्वासन दिल्यानंतर त्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात गेल्याशिवाय सुटू शकत नाही, असेही ते म्हणाले.

पडळकर यांनी धनगर समाजाचे प्रश्‍न घेऊन ज्योत पेटवली. राजकीय मागणी न करता,माझ्या समाजासाठी द्या,अशी मागणी केली,या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन केलं. त्यांना मुंबईत चर्चेसाठी बाेलावून सविस्तर चर्चा केली. आदिवासी समाजाला ज्या २२ योजना लागू आहेत त्या धनगर समाजालाही लागू करण्यात आल्या.यासाठी निधी देण्यात आला. या योजनांचा लाभ धनगर समाजासाठी सुरु देखील झाला आहे. धनगर समाजाला आरक्ष् णाचा प्रश्‍न हा न्यायालयाच्या माध्यमातूनच सुटू शकतो. न्यायालयात आमच्या सरकारने ‘धनगर व धनगड’ हा एकच समाज असल्याचे सांगितले आहे. लवकरच न्यायालयाचा देखील निकाल येईल.

गोपीचंद हे वंचित मधून उभे राहीले तेव्हाच त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता असे मुख्यमंत्री म्हणाले.चार लाख मते घेऊन त्यांनी त्यांची शक्तीही सिद्ध केली. मात्र समाजाचा विकास करायचा असेल तर विरोधक होऊन आंदोलन करण्यापेक्ष्ा सत्तेत राहून समाजाचा विकास घडवा असे त्यांना म्हणालो. आज त्यांनी तो सल्ला ऐकून पुन्हा स्वगृही परतलेत याचा मला अत्यधिक आनंद होत आहे.विरोधकांनी त्यांची राजकीय कारर्कीद संपवण्याचा प्रयत्न केला हे त्यांचे म्हणने अगदी सत्य आहे.खोट्या केसेसमध्ये त्यांना गोवण्यात आले. शिरपूरचे काशीराम यांनी देखील आज पक्ष् प्रवेश केला आहे.शिरपूरमधून सगळे सहकारी भाजपमध्ये येत असल्याने नेत्यांना देखील यावे लागेल,असे मुख्यमंत्री यांनी सूचित केले. प्रारंभी भाजप प्रदेशाध्यक्ष् चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरती सुरुच असल्याचे सांगून लवकरच इतर ही नेते भाजप प्रवेश घेतील,असा सूतोवाच केला.