Published On : Wed, Dec 12th, 2018

यशवंत विद्यालयात गोवर रूबेला लसीकरण संपन्न

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अंतर्गत वराडा उपकेंद्रातील नांदगाव, एंसबा, वराडा जि प शाळा व यशवंत विद्यालय वराडा या चार शाळेतील ३२० विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लसीकरण करण्यात आले.

सोमवार (दि.१०) ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव येथील ५४, एंसबा – ७९, जि प उच्च प्राथमिक शाळा वराडा – ६० व यशवंत विद्यालय वराडा शाळेत गोवर रूबेला लसीकरण मुख्याध्यापिका सौ किर्ती निंबाळकर यांच्या अध्यक्षेत व प्राथमिक आरोग्य केंद्र साटकच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली हिंगे, आरोग्य पर्यवेक्षक सोनटक्के , आरोग्य सेवक दोनारकर, आरोग्य सहाय्यीका पठाण, आरोग्य सेविका उषा चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थित १२७ विद्यार्थ्यांना लस टोचुन मोहीम संपन्न झाली.

वराडा उपकेंद्रातील चार शाळेतील एकुण विद्यार्थ्यांना लस टोचुन लसीकरण करण्यात आले .

गोवर रूबेला रोगाचे समुळ उच्चाटन करण्याकरिता लसीकरण हे ९ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना अत्यत महत्त्वाचे असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना स्वयंफुर्तपणे ही लस अवश्य टोचुन घ्यावी व लसीकरण करण्या करिता सहकार्य करावे असे आवाहन डॉ वैशाली हिंगे यांनी केले .

गोवर रूबेला लसीकरण मोहीमेच्या यशस्वीते करिता राजेंद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, रोशन राऊत, मोतीराम रहाटे , दिपक पांडे, शिक्षिका अर्चना शिंगणे , मोनु चिखले, प्रिया गभणे, रूपाली चिखले, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व उपकेंद्र वराडा चे आरोग्य सेवक ढोमरे, एम डब्ल्यू पंचभाई, जितु लच्छोरे, आरोग्य सेविका प्रेरणा घोटेकर, आशा सेविका सिंधुताई वाढई, कल्पना निमकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .