| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Feb 1st, 2021

  गोपाल नगर तान्हा पोळा क्रिकेट स्पर्धेत शृंगार डेव्हलपर्स ने मारली बाजी !

  गोपाल नगर तान्हा पोळा उत्सव समिती द्वारे आयोजित रात्रकालीन फ्लड लाईट टूर्नामेंट चे रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी समार्पण झाले. शृंगार डेव्हलपर्स ने प्रथम पारितोषिक पटकावत ५१,०००/- रुपये रोख जिंकले. अभ्यंकर नगर द्वितीय स्थानावर राहून त्यांना ३१,०००/- चे रोख बक्षीस मिळाले तसेच तृतीय पारितोषिक म्हणून नवयुवक क्रीडा मंडळ ने २१,०००/- पटकाविले. तिन्ही पारितोषिके ही भांडारकर ज्वेलर्स, सच्चीदानंद रियालिटीस आणि वझलवार ड्राइविंग स्कुल तर्फे देण्यात आली. पारितोषिके महाराष्ट्र राज्याचे दुग्ध विकास व क्रीडा मंत्री मा. श्री. सुनील केदार, पश्चिम नागपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नवनिर्वाचित पदवीधर आमदार मा. श्री अभिजित वंजारी तसेच युवा नेता मा. श्री. विशाल मुत्तेमवार यांच्या हस्ते देण्यात आले.

  शृंगार डेव्हलपर्स चे बिट्टू शर्मा यांना बेस्ट बॅट्समन तसेच मॅन ऑफ द सिरिस म्हणून ट्रॉफी व मंजिरी टेक्सटाईल तर्फे रोख रक्कम देण्यात आली. बेस्ट बॉलर म्हणून कैफु यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. ११ बॉल मध्ये १० छक्के मारण्याच्या विक्रम करणाऱ्या शुभम ला अज्जू जिम तर्फे ३१००/- रु. रोख ने सन्मानित करण्यात आले. १५ जानेवारी २०२१ पासून टूर्नामेंट ची सुरुवात करण्यात आली होती. १६ दिवस चाललेल्या ह्या टूर्नामेंट मध्ये ६४ टीम ने सहभाग घेतला. आमदार श्री. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मॉडर्न सोसायटी-नवनिर्माण सोसायटीच्या विशेष सहयोगाने ही टूर्नामेंट यशस्वी करण्यात आली.

  श्री पंकज निघोट यांनी ह्या टूर्नामेंट चे आयोजन केले तसेच श्री मिलिंद संभे, श्री प्रवीण तुप्पट, श्री आकाश तायवाडे, शंतनु उमरेडकर यांनी ह्या टूर्नामेंट च्या सहआयोजक च्या रुपात टूर्नामेंट ला यशस्वी बनविले. चेतन वस्तानी, राजेंद्र रुईकर, विजय माने, संदेश थूल, प्रणय बेले, वैभव काले, अभय आदमने, अमित ठाकुर, संदीप सैनी, डॉ. सुनील वरकड, नरेश धूमने, प्रशांत गायकवाड़, मनोज गुप्ता, प्रवीण भोयर, आनंद आर्डे, रवी पाटणकर, तन्मय संभे, राजू सहारे, सोनू कनोजिया, अक्षय पिस्के, अभि बांते, आनंद परतेकि, अमेय उमरेडकर, सौरभ कडू, हरीश, प्रफुल गेडाम, अजय नासरे, सारंग बेले, सचिन रहांगदले, शिवम माटे, पप्पू शिवहरे, विनय संभे, संजय तुरणकर, शेखर फुलझेले, अभय सोमकुले, पंकज थोरात, राम वांदिले, सतीश बाळबुधे, अमित त्यागी, शुभम आमधरे, गणेश थोर, निल कन्हेरे, शाहिद पठाण, वैभव इंगळे, राकेश मेंढे, महेश हिंगे, दिनेश काळे, तनय वांदिले इत्यादींचे ह्या टूर्नामेंट मध्ये विशेष सहयोग लाभले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145