Published On : Wed, Nov 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

Google Meet ठप्प;देशभरात ऑनलाइन व्यवस्था कोलमडली, सोशल मीडियावर मीम्सची धूम!

Advertisement

नवी दिल्ली – बुधवार, २६ नोव्हेंबरला Google ची लोकप्रिय व्हिडिओ मीटिंग सेवा Google Meet अचानक डाऊन झाल्याने कामकाजाचा ताळमेळ पूर्णपणे बिघडला. वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचाऱ्यांपासून ते ऑनलाइन लेक्चर्स अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत, सर्वांनाच गंभीर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

अडचण नेमकी कुठे?
आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म ‘डाउनडिटेक्टर’च्या माहितीनुसार, सकाळी जवळपास १२ वाजेपर्यंत ९८० पेक्षा अधिक वापरकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या. प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे:

Gold Rate
26 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,25,900 /-
Gold 22 KT ₹ 1,17,100 /-
Silver/Kg ₹ 1,58,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लॉग इन फेल: अनेकांना अकाऊंटमध्ये प्रवेशच मिळत नव्हता.
मीटिंग लिंक उघडत नाही: ‘Join’ क्लिक करताच सतत एरर दिसत होता.
सेशनदरम्यान खंड: स्क्रीन शेअर थांबणे, मायक्रोफोन – कॅमेरा अचानक ऑफ होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या.
कामकाजात मोठा विस्कळीतपणा-
कॉर्पोरेट कंपन्या, स्टार्टअप्स, शाळा-कॉलेज, एडटेक प्लॅटफॉर्म्स आणि सरकारी विभागांमध्ये Google Meetचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सेवा बंद पडल्यामुळे नियोजित मीटिंग्ज, क्लायंट प्रेझेंटेशन आणि ऑनलाईन क्लासेस अडथळ्यात आले. काही कार्यालयांनी तातडीने पर्यायी प्लॅटफॉर्म वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागले.

#GoogleMeetDown वर मीम्सची लाट-
सेवा कोलमडताच सोशल मीडियावर #GoogleMeetDown हा हॅशटॅग झपाट्याने व्हायरल झाला.
X आणि Instagram वर युजर्सनी मजेदार मीम्स, विनोदी पोस्ट आणि उपरोधिक प्रतिक्रिया देत या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. काहींनी तर ‘Google Meet बंद = अनपेक्षित ब्रेक!’ असे म्हणत गंमतही केली.

Google कडून अधिकृत प्रतिक्रिया नाही-
या बिघाडावर Googleने अद्याप कोणताही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. तांत्रिक तज्ञांच्या मते, समस्या बहुधा सर्व्हर-लेवल त्रुटी असावी जी Google दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत असू शकते.
वापरकर्त्यांनी ब्राउझर बदलून किंवा पेज रीफ्रेश करून मीटिंगमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून समाधानकारक फायदा झाला नाही.

दरम्यान, युजर्सना Google च्या Service Status Update ची प्रतीक्षा असून, Google Meet सेवा पुन्हा सामान्य होण्याची आशा सर्वांनाच लागली आहे.

Advertisement
Advertisement