Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 30th, 2020

  नागपूर लाईव्ह सिटी ॲपला चांगला प्रतिसाद

  नागपूर : नागरिकांना महानगरपालिकेच्या संबंधित कामाचे बाबतीत कार्यालयात येण्याची आवश्यकता पडू नये यासाठी नागरिकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी “नागपूर लाईव्ह सिटी ॲप” जनतेसाठी तयार केले आहे. या ॲपला आजपावेतो जवळपास 23000 नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे.

  नागपूर महानगरपालिकेनी नागपूर लाईव्ह‍ सिटी ॲपच्या माध्यमाने नागरिकांचे 91 टक्के तक्रारींची सोडवणूक केली आहे. मनपाला आतापर्यत 10248 तक्रारी प्राप्त झाल्या असून 9302 तक्रारींचा निपटारा झाला आहे. प्राप्त तक्रारीपैकी मात्र 800 प्रलंबित आहेत आणि 146 तक्रारी नागरिकांकडून पुन्हा उघडण्यात आल्या आहे. नागरिकांनी सिवर लाईन, कचरा, रस्ते निर्माण, पथदिवे, मोकाट कुत्रे, रस्त्यावरील अतिक्रमणे इ. बाबत तक्रारी नोंदविल्या आहेत.

  तक्रारींवर माहितीही संबंधित नागरिकांना ॲपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मुलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर ॲप सध्या ॲन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http:// www .nmcnagpur. gov .in / grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या ॲपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन,रस्ते, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी ॲपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.

  विशेष म्हणजे ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर खुद्द मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून याचा ते वेळोवेळी आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ॲपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे ॲप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145