Advertisement
नागपूर : राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.
लाभार्थी महिलांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
येत्या 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे.
महिला दिनाचं औचित्य साधून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हफ्ता जमा करण्यात येणार आहे. याबाबत 5 ते 6 मार्चपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे तटकरे म्हणाल्या.