Published On : Tue, May 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महसूल नोंदीतून 1.67 हेक्टर जमीन गायब? गोंदियात शेतकऱ्याचे पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन!

Advertisement

गोंदिया : महसूल नोंदीतील स्वतःची शेतजमीन कमी झाल्याचा गंभीर आरोप करत एका शेतकऱ्याने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केल्याने गोंदियात खळबळ उडाली आहे. पालेवाडा येथील शेतकरी कृष्णकुमार डोये यांनी “जोपर्यंत माझी जमीन महसूल रेकॉर्डवर येत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Gondia जिल्ह्यातील पालेवाडा येथे सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डोये यांनी महसूल विभाग, तहसील कार्यालय आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने व पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकरी कृष्णकुमार डोये यांच्या माहितीनुसार, मौजा पालेवाडा येथील जुना गट क्रमांक 336 अंतर्गत त्यांच्या वडिलांच्या नावे एकूण 10.14 हेक्टर जमीन नोंद होती. 1989 मध्ये या जमिनीची कायदेशीर विभागणी करून फेरफार नोंद करण्यात आली होती. त्यानुसार गट क्रमांक 336/4 आणि 336/5 असे विभाजन करण्यात आले होते.

मात्र तलाठी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुना गट क्रमांक 336 हा नवीन गट क्रमांक 417 मध्ये रूपांतरित करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, नव्या महसूल नोंदीत एकूण क्षेत्रफळ 10.14 हेक्टरऐवजी केवळ 8.47 हेक्टर दाखवण्यात आल्याचा आरोप डोये यांनी केला आहे. त्यामुळे तब्बल 1.67 हेक्टर जमीन महसूल रेकॉर्डमधून गायब झाल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर किंवा आश्वासन मिळत नसल्याने अखेर डोये यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून शेतकऱ्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून महसूल विभाग आता या प्रकरणाची चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ #Crime #NagpurCrime #HouseTheft #News

कामठी में बंद घर पर चोरों का धावा! ताला तोड़कर गहने-नकदी साफ...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges