Published On : Sat, Jul 7th, 2018

गोंडेगाव कोळशा खदानची माती, कोळशाचे दगड,पाणी शेतात शिरले.

कन्हान : सकाळ पासुन झालेल्या जोरदार पावसाने वेकोलि गोंडेगाव खुली कोळशा खदानच्या माती डम्पिंग मुळे मोठमोठय़ा कृतिम टेकडयाची माती , कोळसा स्लाक दगड, पाणी वाहुन लगतच्या शेतकऱ्याच्या शेतात शिरून, पाणी साचुन गोंडेगाव, घाटरोहना, वराडा येथील शेतकऱ्याच्या शेतपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने मायबाप सरकारने वेकोलि गोंडेगाव कोळशा खदान प्रशासनाकडुन त्वरित नुकसान भरपाई मिळवुन दयावी अशी कळकळीची मागणी शेतकऱ्याच्या वतीने जि.प.सदस्या कल्पनाताई चहांदे व गोंडेगावचे सरपंच नितेश राऊत यांनी केली आहे.

शुक्रवार (दि.६) जुलै ला सकाळ पासुन आलेल्या जोरदार पावसाच्या पाण्याने वेकोलि गोंडेगाव खुली कोळशा खदानच्या माती डम्पिंगच्या कृतिम टेकडयावरून पावसाच्या पाण्यासोबत डम्पिंग माती , कोळशाचे स्लॉक दगड व माती लगतच्या शेतात शिरून व पाणी साचुन पराटी (कपाशी), तुर , वागी, भेंडी , कारले आदी पिक नेस्तानाबुत होऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे .

पावसाळा लागण्याच्या दोन महिन्या पुर्वी पासुन कोळशा खदान लगतच्या शेतकऱ्यानी वेकोलि गोंडेगाव खदान, तहसिलदार पारशिवनी व सबंधित अधिका-यांना पुर्व सुचना देऊन सुध्दा वेकोलि प्रशासनाना व्दारे योग्य खबरदारी न घेता खानापुर्ती म्हणुन पाणी निकासी करिता अर्धवट नाला पोकलेंड मशीनने काढल्याने पावसाचे पाणी व्यवस्थित बाहेर न जाता लगतच्या शेतात शिरून वेकोलि गोंडेगाव खदान च्या निष्काळजीपणाने आज सकाळच्या पावसाच्या पाण्याने
१) मोरेश्वर यादोवराव शिगणे ख न. १२२/अ ८१ आर,
२ ) निखिल मोरेश्वर शिंगणे १२२/ ब ८१ आर,
३) संजय मोहन नाईक ६१/२, क ९ एकर,
४) ललीत संजय नाईक १ एकर,
५) माणिक भाना नाईक ६१/१, दोन एकर,
६) अजय माणिक नाईक १ एकर,
७) पौर्णिमा मोरेश्वर रंगारी ६० / १ , तीन एकर,
८) सिताराम दामोदर गजभिये ७ एकर,
९) अजय जानरावजी दलाल १० एकर,
१०) संजय गोपाळराव लांडगे ख.न. १२८ अडीच एकर,
११) विष्णु गोपाळराव लांडगे ख.न.१३० दहा एकर,
१३) कैलास गोपाळराव लांडगे ख.न.१२९ अडीच एकर,
१४) सुभाष गुंडेराव हुड २ एकर,
१५) नितेश दत्तुजी काठोके २ एकर, १६)अनिकेत वंसतराव बोडारे २ एकर,
१७) राजेश मोहन नाईक ६१ / अ दोन एकर,
१८) शिवदास मोहन नाईक ६१/ ३ दोन एकर,
१९ ) डुमणजी उत्तम दलाल ४ एकर,
२०) सुधाकर उत्तम दलाल ४ एकर,
२२) अरूण जानरावजी दलाल दोन एकर,
२३) जानराव आंनदराव दलाल १० एकर,
२४) मुरलीधर तुकाराम डोकरीमारे २ एकर,
२५) क्रिष्णा रामाजी राऊत ३ एकर,
२६) लक्ष्मण राऊत ५ एकर.
२७) आ़ंनद दामोदर गजभिये ख.न. २०४ साडेसहा एकर,
२८) चंद्रकांत तुकाराम गजभिये ख.न. २०३ साडेसात एकर तसेच वराडा ,

घाटरोहना येथील शेतकऱ्याच्या शेतपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असुन परिवाराचा उर्दनिर्वाह कसा करायचा हा गंभीर प्रश्न सामोरं उभा ठाकला आहे करिता मायबाप सरकारने नुकसान झालेल्या शेतपिकाचा सर्वेक्षण व मौका चौकसी करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र , वेकोलि कामठी उपक्षेत्र च्या व्दारे त्वरित नुकसान भरपाई मिळवुन दयावी अशी मागणी जि.प. सदस्या कल्पनाताई चहांदे व गोंडेगाव चे सरपंच नितेश राऊत, ग्रा.प.सदस्य मोरेश्वर शिंगणे सह शेतकऱ्यांनी व ग्रामस्थानी केली आहे .