रामटेक : ०८ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे भव्य पुरस्कार वितरण समारंभात, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांनी रस्ते बांधकाम आणि देखभाल यांच्या विविध श्रेणी मध्ये उत्कृष्ठतेसाठी विविध राष्ट्रीय महामार्ग कंपन्यांना पुरस्कृत केले.
नागपुर क्षेत्रातील प्रतिष्ठित “नागपुर -सावनेर -बैतूल महामार्ग प्रकल्प” ला उत्कृष्ठ बांधकाम कंत्राट व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलेे आहे. नागपुर-सावनेर – १७६ किमी.लांबीच्या बैतुल रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून २०१५ मध्ये लोकार्पण करण्यात आले.
श्री एम.चन्द्रशेखर, प्रादेशिक अधिकारी, एन.एच.ए.आई.आरओ नागपुर आणि श्री जे.पी. गुप्ता संचालक (प्रकल्प), मेसर्स ओरिएंटल नागपुर-सावनेर-बैतुल हायवे लिमिटेड यांनी पुरस्कार प्राप्त केले आणि प्रसार माध्यमांना सूचित केले कि हा पुरस्कार साधारणपणे आणि उत्कृष्ठ गुणवत्ता सेवा प्रदान करण्याकरिता आहे.
हा पुरस्कार केवळ प्रकल्पाशी निगडित कंत्राटदराचा सन्मान नसून तर प्रकल्प महामार्गाच्या परिसरातील नागरिकांचा हि आहे कारण त्यांच्या प्रेरणा व सहकार्याशिवाय हा प्रकल्प साकार होने अशक्य कोटीतील गोष्ट होती.नक्कीच अश्या प्रकारे पुरस्कृत केल्यामुळे या क्षेत्रातील (रस्ते बांधनी) कंपन्यांना आपल्या सेवा, गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
आश्या कंपन्यांना पुरस्कृत करण्यात येते ज्या महामार्ग प्रकल्पाच्या बांधकाम, संचालन, टोलिंग व देखभाल च्या दरम्यान उत्कृष्ठ दर्जाच्या गुणवत्ता सेवा प्रदान करतात. विजेच्या कंपन्यांना मोर्थ (Morth) द्वारे मान्यता दिली जाते.


