Published On : Thu, Apr 22nd, 2021

संकटसमयी मदत करणारा देव माणूस भास्कर चव्हाण

Advertisement

कामठी :-जगभरातील लोकं कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहेत.डॉक्टर नर्सेस, पोलीस, त्याची जवाबदारी कर्तव्यदक्ष भूमिकेतून साकारत तर आहेतच मात्र सर्वसामान्य माणसेही या लढाईत मागे नाहीत.यामध्ये येथील मोंढा रहिवासी असलेला एकल जीवन व्यतीत करणारा भास्कर चव्हाण हा कोरोना मयतीच्या अनेक कुटुंबाचा एक आधार बनला आहे.

कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तींचे मृत्यू झाले असेल राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या कोरोणाबधित मयतीच्या कुटुंबियांना कोरोनाबधित मयतिच्या अंत्यसंस्कारासाठी भास्कर चव्हाण व सहपाठी हे स्वता पुढाकार घेऊन मयती जाळत आहेत.सध्या कोरोना संसर्गाच्या भीतीने कोरोनाबधित मृत व्यक्तीच्या जवळ त्याच्या घरचे लोकं जाऊ शकत नाहीत अशा संकटसमयी मदत करणारा देव माणूस भास्कर चव्हाण हा अग्रगण्य पणे पुढे येऊन मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करीत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाबधित वा नॉन कोविड मृतकाना सममानाने या जगातुन निरोप देण्याचा काम करीत असून भास्कर चव्हाण हा एकल जीवन जगत असून शिवथाळी केंद्रातून मिळणाऱ्या एक वेळच्या जेवणावर स्वतःची भूक भागवितो व दिवस रात्र त्या मोक्षधाम मध्ये राहुन मृतकाचे अंत्यसंस्कार करण्याचे मौलिक कार्य करीत आहे.अशा संकटकाळी कोरोनाबधित मृतकाना सम्मानाने शेवटचा निरोप देणारे भास्कर चव्हाण या देव माणसाला व त्याच्या सहपाठीला मानाचा मुजरा देवाचं असणं याबद्दल दुमत असेल मात्र देवत्वाबद्दल कुणाचं दुमत होण्याचे कारण नाही.

आजच्या बिकट परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग न व्हावा यासाठी माणूस माणसापासून दूर जात आहे. कुटुंबातील व्यक्ती हा कोरिणाबधित होऊन मृत्यू झाला तर या अंतिम वेळेत कुटुंबीय सदस्य असूनही मुखाग्नी देत नाही त्यातच कुठलेही नाते संबंध नसणारे भास्कर चव्हाण व सहपाठी मित्र हे कोरोणाबधित मृत्कक असो वा नॉन कोविड मृतक असो यांना मुखाग्नी सह मोक्षधाम मध्ये शरण रचून मुखाग्नी देत अंत्यसंस्कार करण्याचे मौलिक कार्य हे भास्कर चव्हाण करीत आहेत.

संकटकाळी अचानकपणे एखादा माणूसही उभा राहतो आणि घाबरू नको मी आहे म्हणतो तेव्हा सहज उद्धार येतात’देवासारखा धावून आलास!”कारण संकटात असणाऱ्याला तिथं देवत्व दिसत आहे म्हणूनच देवाचा शोध घेतला की निराळा देव शोधण्याची गरज नाही हा देवत्वाचा शोध म्हणजे माणुसकीचा शोध म्हणावे लागेल आणि ही माणुसकी अंत्यसंस्कार करणाऱ्या भास्कर चव्हाण मध्ये दिसून येतो.दिवसभरात जवळपास दररोज 15 च्या वर मयतीवर अंत्यसंस्कार करण्याची मोलाची भूमिका साकारतो आणि तो अजूनही निरोगी आहे…हे इथं विशेष!