Published On : Tue, Feb 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये ग्लॅमरचा जल्लोष; ‘फिनॉमिनल फेस ऑफ इंडिया 2026’ ग्रँड फिनाले दिमाखात संपन्न!

Advertisement

नागपूर – नागपूर शहरात फॅशन, व्यक्तिमत्त्व विकास आणि ग्लॅमरचा संगम पाहायला मिळाला तो ‘फिनॉमिनल फेस ऑफ इंडिया 2026’च्या भव्य ग्रँड फिनालेमध्ये. शहरातील नामांकित Bougainvillea Banquet, नागपूर येथे पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थित प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव दिला.

विविध वयोगटातील सुमारे 50 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तीन दिवसांच्या व्यावसायिक ग्रूमिंग आणि प्रशिक्षणानंतर ग्रँड फिनालेच्या मंचावर स्पर्धकांनी आत्मविश्वास, स्टेज प्रेझेन्स आणि व्यक्तिमत्त्वाची प्रभावी छाप पाडली.

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या स्पर्धेची संकल्पना व आयोजन रश्मी गंगार आणि रितेश दुर्णे यांनी केले. शो डायरेक्टर म्हणून खिझर हुसेन यांनी तर शो को-डायरेक्टर म्हणून पायल शाहू यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले ते लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री ईशा मालवीया यांचे त्यांनी सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अधिकृत मेकअप आणि डिझायनर शोकेस
ग्रँड फिनालेसाठी अधिकृत मेकअपची जबाबदारी भक्ती आदित्य खेडकर (संस्थापक – ग्लिटेरो ग्लेझ, नागपूर व पुणे), पिहू गोंधुळे (संस्थापक – पिहू मेकओव्हर) आणि त्यांच्या टीमने सांभाळली.

डिझायनर शोकेसमध्ये निहाल ठाकूर, आराधना द फॅशन मॉल, अनुसया ब्युटी वर्ल्ड, अप्पाजी द एथनिक मेन्स वेअर तसेच दुल्हे राजा – द मेन्स वेअर यांच्या कलेक्शनने रॅम्पवर ग्लॅमरची भर घातली.

अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर-
मिस नेहा भोयर यांची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली.

‘फिनॉमिनल फेस ऑफ इंडिया 2026’ विजेते
मिस कॅटेगरी – मनीषा म्हैस्के
मिसेस कॅटेगरी – रीना मगर
मिस्टर कॅटेगरी – आस्वाद वाडपल्लीवार
किड्स कॅटेगरी – पाविका सुदान, गुरनूर चौहान, शौर्य खोबरागडे आणि स्पर्श मून
दरम्यान या स्पर्धेमुळे उदयोन्मुख मॉडेल्स आणि पेजंट स्पर्धकांना मोठ्या प्रमाणावर एक्सपोजर आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या यशानंतर आयोजकांनी ‘फिनॉमिनल फेस ऑफ इंडिया’चा सीझन 3 दुबई येथे आयोजित करण्याची घोषणा केली असून, हा सीझन अधिक भव्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असेल, अशी माहिती देण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement