कन्हान : – धान पिक बर्बाद होण्याच्या वाटेवर असल्याने चिंतातुंर शेतकऱ्याच्या हितार्थ पेंच धरणाचे नहाराने पाणी देण्याची मागणी किसान कॉंग्रेस कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे सह शेतकऱ्यांनी केली आहे .
पारशिवनी तालुक्याचे बहतेक शेतकरी पेंच धरणाच्या नहराच्या पाण्यावर शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात यावर्षी धान लावणी करिता नहाचे पाणी मिळाल्याने धान पिक उभे राहिले परंतु आता जर धरणाचे पाणी मिळाले नाहीतर कसेतरी हातात येणाऱ्या धान पिक बर्बाद होण्याच्या वाटेवर असल्याने चिंतातुंर शेतकऱ्याच्या हितार्थ पेंच धरणाचे नहाराने पाणी देण्याची मागणी किसान कॉंग्रेस कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे व देवाजी ठाकरे , भगवानजी भास्कर रेड्डी , रवींद्र गुडधे , आत्माराम उकुंडे , नानाजी राऊत, सिताराम भारव़्दाज,व्यकटेश वाकलपुडी , लक्ष्मीकांत काकडे, मोरेश्वर गांवडे , दिलीप बांजनघाटे, धर्माजी काकडे सह परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यानी केली आहे .
