मुंबई : विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या कृपेने महाराष्ट्रात सुखसमृद्धी आणि शांतता नांदू दे, चांगला पाऊस पडून शेती हिरवाईने डोलू दे, अशी प्रार्थना आपण त्याच्या चरणी केली असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
शुक्रवार 21 सप्टेंबरला त्यांनी मुंबईतील विविध गणेशमंडळांना भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
त्यावेळी ते बोलत होते. अर्थमंत्र्यांनी गिरगावचा राजा, अभिनेते नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेला श्रीगणेश, टीव्ही 9 या वृत्तवाहिनीच्या कार्यालयातील स्थापित गणेशाचे व इतर गणेशमंडळांच्या तसेच मित्र-परिवार आणि माध्यम प्रतिनिधींच्या घरी आगमन झालेल्या बाप्पांचे दर्शन घेतले.
Advertisement

Advertisement
Advertisement