Published On : Fri, Apr 27th, 2018

युपीएससीमध्ये महाराष्ट्रातून गिरीश बडोले पहिला, इतर 13 विद्यार्थ्यांना यश

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 चा निकाल जाहीर झाला असून यात उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले राज्यात पहिला आला आहे. देशात त्याचा क्रमांक 20 वा लागला आहे. आयोगाने आज आपल्या अधिकृत वेबसाईटवर (upsc.gov.in)हा निकाल जाहिर केला.

आएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवा यांच्यासह इतर सरकारी विभागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ९८० पैकी ५४ जागा आरक्षित होत्या. २८ ऑक्‍टोबर २०१७ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा झाली होती. देशभरातून ९८० जागांसाठी ही परीक्षा झाली होती.

Advertisement

महाराष्‍ट्रातील बाजी मारलेल्या इतर 13 परीक्षार्थींची नावे पुढीलप्रमाणे आहे. सुयश चव्हाण (५६), भुवनेश पाटील (५९), पियुष साळुंखे (६३), रोहन जोशी (६७), राहुल शिंदे (९५), मयुर काटवटे (९६), वैदेही खरे (९९), वल्लरी गायकवाड (१३१), यतिश विजयराव देशमुख (१५९), रोहन बापूराव घुगे (२४९), श्रीनिवास वेंकटराव पाटील (२७५), प्रतिक पाटील (३६६), विक्रांत सहदेव मोरे (४३०)

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement