Representational pic
पुणे: वाघोलीतील रायसोनी काॅलेजमध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल कशामुळे उचलले हे समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी काॅलेजमध्ये बीई इलेक्ट्राॅनिक्सच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या रश्मी प्रभू करनेवाड (वय 22, मूळ नाशिक रहिवासी) हिने शनिवारी सकाळी अकरा वाजता इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला लगेच जवळच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण प्रकृती बिघडल्याने तिला रुबी हाॅस्पिटलला हलवावे लागले. तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.