Published On : Thu, Apr 12th, 2018

नोकरी लागताच प्रेयसीचा लग्नास नकार!

Hudkeshwar Police Station
नागपूर: चित्रपटात शोभेल अशा एखाद्या `हिरो’प्रमाणे शरीयष्टी अशलेल्या युवकाला बघून युवती त्याच्यावर भाळली. तिने मोबाईल क्रमांक प्राप्त करीत त्याच्याशी मैत्री केली. कालांतराने मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. युवतीने आधी प्रेमाचा, नंतर थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान तोही तिच्या प्रेमात ओढल्या गेला. जिवापाड प्रेम करणाऱ्या त्या प्रेयसीला एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी लागली. आणि येथेच या सुंदर प्रेमाला दृष्ट लागली. तिने चक्क त्यास लग्नास नकार देत वेगळ्या मार्गाने जाण्याचा आपला निर्णय बोलून दाखविला. त्यामुळे सलग ८ वर्ष प्रेयसीने आपले लैगिंक शोषण केल्याचा आरोप करीत त्या पिडीत युवकाने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज पत्रकार परिषदेत केली.

शशांक असे त्या पिडीत युवकाचे नाव असून तो सक्करदरा हद्दीत राहतो. तर पिडीत युवती मोना (बदललेली नाव) ही सक्करदरा हद्दीत राहते. शशांकच्या मते, दोघांची वर्ष २००८ मध्ये एका लग्नात ओळख झाली. युवतीच्या नातेवाईकांचे ते लग्न होते. दरम्यान तिने एका नातेकाईकाच्या माध्यमातून माझा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन मैत्री केली. दरम्यान मी पुरत तिच्या प्रेमजाळ्यात ओढला गेलो. त्यामुळे तिने मला भेटण्याचा तगादा लावला. त्यावेळी मी अभियांत्रिकीचे शिक्षण व खाजगी नोकरी करायचो. त्यामुळे सुरुवातीला मी तिला टाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी भेटल्यानंतर तिने माझ्यासमोर प्रेमाची मागणी घातली. प्रपोज केल्यानंतर तिला नकार देऊ शकलो नाही. तेव्हापासून आमचे प्रेम संबंध निर्माण झाले. दोघांच्या भेटी वाढत गेल्या. आपल्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. त्यानंतर माझ्या आई-वडीलाशी भेट घालून देण्यासाठी तगादा लावला. वडील स्ट्रिक असल्याने मी टाळले. पण एके दिवशी तिची घरच्यांशी भेट घालून द्यावी लागली. यावेळी मोनाने ठेवलेला लग्नाच्या प्रस्तावास माझ्या आईने होकार दिल्याने आमच्या भेटीगाठी वाढल्या. पती-पत्नीप्रमाणे आम्ही वागू लागलो. यादरम्यान तिने शारीरीक संबंधाची मागणी केली. तसा तिने माझ्यावर दबाब टाकला. पण मी, लग्नानंतर हे सर्व करु या, असे तिला स्पष्ट सांगितले. एके दिवशी तिने मला घरी बोलाविले आणि घरी कुणी नसतांना भावनीक दबाब टावूâन माझ्या मर्जीविरुद्ध संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर वारंवार ती माझ्यावर शारीरीक संबंधासाठी दबाब टाकायची. नाईलाजाने मला होकार द्यावा लागत असे. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे मी तिच्या आश्वासनाला भुललो.

वर्ष २०१४-१५ ला तिला एसबीआय बँकेत लिपीक पदावर नोकरी लागली. त्यानंतर दोघेही लग्नाचे स्वप्न रंगवू लागलो. परंतु, बँकेतील प्रशिक्षण कालावधी संपण्यावर येत नाही, तोच तिच्या वागणूकीत बदल झाला. त्यानंतर तीला लग्नाविषयी विचारले असता लवकरच करु असे म्हणून टाळणे सुरु केले. आता तर तीने लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी अशी कशी वागू शकते, असा प्रश्न पडला. दुसरीकडे मुलींकडूनही मुलाचे लैंगिक शोषण होऊ शकते काय, असा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रकरण सक्करदरा पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले असले तरी पिडीत कुणाला म्हणायचे, आणि कारवाई कुणावर करायची, अशी संभ्रमावस्था पोलिसांची सध्या तरी झाली असावी, असे वाटते.

हुडकेश्वर पोलिसांनी कारवाई टाळली
प्रेयसीच्या वडीलांनी शशांकला लग्नाच्या बोलणीकरीता ९ एप्रिलला आपल्या घरी बोलाविले. मात्र लग्नाची बोलणी करण्याऐवजी कडाक्याचे भांडण केले. दरम्यान वाद वाढला आणि प्रेयसीच्या वडीलांनी अचानक सशस्त्र हल्ला केला. मात्र शशांकने चावूâ हातात पकडून ठेवल्याने तो थोडक्यात वाचला. यावेळी त्याच्या हाताची बोटे कापल्या गेली. त्यामुळे त्याने जवळचे हुडकेश्वर पोलिस ठाणे गाठले. मात्र येथील कर्मचाNयांनी त्याची आपबिती ऐकुन घेत त्याला सक्करदरा पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला न देता परतावून लावल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्वत:ला पिडीत सांगणाNया शशांकने दिली.