नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात जिगोलो म्हणजेच पुरुष वेश्यावृत्तीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे नेटवर्क नागपूर, मुबंईत दिल्लीसह अनेक राज्यात पसरले आहे. एका मोठ्या वृत्तपत्राने नागपुरात सुरु असलेल्या या गोरखधंद्या विषयी श्रुंखलाच चालवली आहे. यादरम्यान या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस आले. गड्डीगोदाम येथे राहणाऱ्या (IK) नावाचा व्यक्ती शहरातील प्रतिष्ठित महिलांसोबत मिळून हे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. यात तीन म्हणजे पहिली (KK), दुसरी (SK)आणि तिसरी (KB) या नावाच्या महिलांचा समावेष आहे. या तिन्ही महिला प्रतिष्ठित असल्याची माहिती आहे.
नागपुरात महिलांच्या किटी पार्टीत या तिन्ही आयोजक महिलांनी काही ‘जिगोलो’ युवकांना बोलावले होते. तेथून संपर्कात आलेल्या एका जिगोलोला एक महिला (KK) वारंवार नागपुरात बोलवत होती. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची पोलिसांत जरी तक्रार नसली तरी शहरभर मोठी चर्चा आहे.
नागपुरातील एका उद्योगपतीच्या उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत वारंवार जाण्याची सवय होती. दुसरीकडे पती सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात व्यस्त राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्या महिलेच्या मैत्रिणींनी वर्धा रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये किटी पार्टी आणि स्नेहमिलन आयोजित केले. रात्रभर चालणाऱ्या पार्टीत ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ पुरविणाऱ्या कंपनीकडून काही ‘जिगोलो’ (पुरुष वेश्या) बोलावण्यात आले होते. पार्टी संपल्यानंतर दिल्लीतील एका ‘जिगोलो’ युवकाचा मोबाईल क्रमांक महिलेने घेतला. काही दिवसांनंतर तिने त्याला फोन केला. ‘स्पेशल सर्व्हिस’ म्हणून विमानाचे तिकिट आणि मोबदला म्हणून १ लाख रुपये त्या युवकाने मागितले. महिलेने सर्व अटी मान्य करीत पैसेही दिले. तेव्हापासून ही महिला त्या युवकाला पैसे देऊन दिल्लीवरुन नागपुरात बोलवित होती. अनेकदा तो युवक नागपुरात येऊन गेला. दोघेही रात्रभर महागड्या हॉटेलमध्ये वेळ घालवत होते. पहाटेच्या सुमारास महिला घरी परत येत होती.मात्र एके दिवशी या महिलेचा भंडाफोड झाला. तसेच शहारत सुरू असलेल्या जिगोलो रॅकेट उघडकीस आले.
पोलीस विभागाकडून कारवाई का नाही ?
नागपुरात सुरु असेल्या जिगोलो रॅकेटच्या विरोधात कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्याच्या पत्नीसोबत एका आलिशान हॉटेलमध्ये अडकलेल्या जिगोलोला एका रात्रीसाठी ५०,००० रुपये देण्याचे ठरले. पकडले गेले तेव्हा सुरुवातीला ती महिला आणि जिगोलो म्हणत होते की ते मित्र आहेत. जेव्हा हे प्रकरण पोलीस सस्टेशनमध्ये नेण्याचे उद्योगपतीने ठरविले तेव्हा जिगोलो ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’शी संबंधित असल्याचे उघड केले. त्यानंतर पत्नीच्या बदनामीच्या भीतीने पतीने तक्रार करणायचा निर्णय मागे घेतल्याची माहिती आहे. मात्र ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’शी संबंधित प्रकरणी पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
नागपुरातील (KK) (SK) (KB) या तीन महिला कुठे झाल्या गायब-
नागपुरात उघडकीस आलेल्या जिगोलो कांडनंतर (KK) (SK) (KB) या नावाच्या महिला प्रकाशझोतात आल्या. या महिला शहरातील इतर प्रतिष्ठित आणि श्रीमंत महिलांसाठी खास जिगोलो उपलब्ध करून देण्याचे काम करत होत्या. सध्या या महिला (KK) सध्या नागपुरात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या महिला दिल्लीत असल्याची चर्चा असून जिगोलो प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर त्या गायब झाल्याचे बोलल्या जात आहे.