Published On : Thu, Mar 5th, 2020

नागपुरात ‘गझलबहार’चं आयोजन राष्ट्रीय एकतेवर मराठी, हिंदी, उर्दू मुशयरा

नागपूरातील गझलप्रेमी रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘गझलबहा’ या मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी मराठी-हिंदी-उर्दू मुशायऱ्याचं येत्या ७ मार्चला आयोजन करण्याच आलंय. हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात ५:३० वाजता हा मुशायरा सुरु होणार आहे. हा सर्वांसाठी निःशुल्क मुशायरा आहे.

गझलप्रेमी रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘गझलबहा’ या मुशायऱ्यात, अनेक दिग्गज गझलकारांचा सहभाग हेच या मुशायऱ्याचं खास आकर्षण आहे. गझलकार अजीजखान पठाण, अनंत नांदूरकर, डाॅ. समिर कबीर, किरण काशिनाथ, चित्रा कहाते, धनश्री पाटील आणि शिरीष नाईक यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी या गझलबहारचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ उर्दू शायर हमीद अंसारी असणार आहे, तर या गझलबहारचे मुख्य अतिथी म्हणून ‘टीव्ही ९ मराठी’चे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे असणार आहे. डाॅ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते गझलबहारचं उद्घाटन होणार आहे. वृंदा ठाकरे आणि देवदत्त संगेत विशेष अतिथी असणार आहे.

नागपूरातील जास्तीत जास्त गझलप्रेमी रसिकांनी गझलबहार कार्यक्रमात उपस्थित रहावं, असं आवाहन आयोजकांनी केलंय.