नागपूर, , नागपूर महानगरपालिका (NMC) व ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांच्या समन्वयाने GH-मेडिकल फीडरवरील पाणीपुरवठा दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता ते २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत (२४ तास) बंद ठेवण्यात येणार आहे.
या काळात खालील काम हाती घेण्यात येणार आहे :
सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या मेडिकल फीडरचे ७०० × ७०० मि.मी. व्यासाचे नवीन अमृत फीडरशी इंटरकनेक्शनचे काम, कॉटन मार्केट चौक, लोहा पुलाजवळ.
प्रभावित क्षेत्रे :
GH-मेडिकल फीडर कमांड क्षेत्र: GMC, टी.बी. वॉर्ड, SECR रेल्वे, टाटा कॅपिटल, रामबाग कॉलनी, राजाबक्ष, इंदिरा नगर, जाटारोडी क्र. ३, अजनी रेल्वे, रामबाग म्हाडा, शुक्ला आटा चक्की, उंटखाना, ग्रेट नाग रोड, बोरकर नगर, बारा सिग्नल.
गॉदरेज आनंदम ESR कमांड क्षेत्र: दक्षिणामुर्ती चौक, पाताळेश्वर रोड, बिनजानी महिला शाळा, कोतवाली पोलीस चौक, पंचांग गल्ली, छोटा राम मंदिर, जुने हिस्लॉप कॉलेज, अत्तर ओली, रामजीची वाडी, कर्नल बाग, तेलीपुरा, गाडिखाना, जुनी शुक्रवारी, जौहरीपुरा.
वरील भागातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि जलपुरवठा बंद असताना ते सुज्ञपणे वापरावे. नियोजित काम पूर्ण झाल्यानंतर जलपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.